Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. अंदाज ठरला खरा.. पाकिस्तानमध्ये पडलाय ‘त्याचा’ दुष्काळ; सरकारही होतेय हैराण; जाणून घ्या, नेमके काय घडले ?

नवी दिल्ली : कोरोना संकटात महागाईचे संकट त्यानंतर आता गॅसचे संकट पाकिस्तानमध्ये निर्माण झाले आहे. येथील लोकांना घरगुती गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे. औद्योगिक वापरासाठीही गॅस मिळणे कठीण झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून अशी परिस्थिती आहे. हिवाळ्याच्या दिवसात घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी गॅसची मागणी जास्त असते आणि नेमक्या याच दिवसात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील नागरिक पुन्हा एकदा सरकारवर संतापले आहेत.

Advertisement

देशातील सिंध प्रांतात जवळपास 70 टक्के नैसर्गिक वायूचे उत्पादन होते. न्यूज इंटरनॅशनलच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी जून 2021 च्या तिसऱ्या आठवड्यात सुई सदर्न गॅस कंपनीने (SSGC) कराचीमधील विविध उद्योग कंपन्यांना गॅसचा पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद केला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

Advertisement

न्यूज इंटरनॅशनलने वृत्त दिले आहे, की 2008 मध्ये, सरकारला देशात मोठ्या प्रमाणात गॅसच्या टंचाईमुळे समस्यांचा सामना करावा लागला होता. ज्यामुळे देशातील लोकांनाही खूप त्रास झाला होता. पाकिस्तान इकॉनॉमी सर्व्हे 2019-2020 च्या 14 व्या प्रकरणामध्ये, PTI ने स्पष्टपणे म्हटले आहे की, सध्याच्या सरकारने देशातील गॅसची कमतरता पूर्ण करण्यासाठी LNG आयात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे देशात निर्माण झालेल्या गॅसच्या संकटावर मात करणे शक्य होईल.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशात गॅस टंचाईचे संकट येणार असल्याचा इशारा एका मंत्र्यांने काही दिवसांआधीच दिला होता. आगामी काही वर्षात पाकिस्तानकडे नैसर्गिक गॅस नसेल. मागील दोन वर्षांपासून देशात प्रत्येक वर्षात 9 टक्क्यांनी गॅस कमी होत आहे, असे पाकिस्तानचे सूचना मंत्री चौधरी यांनी सांगितले होते.

Advertisement

देशातील मोठ्या शहरांमध्ये 23 टक्के नागरिकांना सवलतीच्या दरात एलपीजी गॅस उपलब्ध आहे. या सवलतीमुळे देशाच्या अन्य शहरांतील नागरिकांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे मोठ्या शहरात जे लोक सवलतीच्या दरात गॅस घेत आहेत, त्यांना आता आपल्या सवयींमध्ये बदल करावा लागणार आहे. कारण, आता ही पद्धत जास्त काळ सुरू ठेवणे शक्य होणार नाही. देशातील सर्व नागरिकांना समान पुरवठा करण्यासाठी सरकारला आता गॅस वितरण प्रणालीचा फेरविचार करणे आवश्यक आहे, असे चौधरी यांनी सांगितले होते.

Advertisement

अर्र.. आता काहीच वर्षात पाकिस्तान मध्ये पडणार ‘त्याचा’ दुष्काळ; सरकारने लोकांना दिलाय ‘हा’ इशारा

Advertisement
Advertisement

Leave a Reply