Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

JIO ने दिलीय मोठी खुशखबर..! आता मोबाइल रिचार्जही होईल आपोआप.. रिचार्ज लक्षात ठेवण्याचा त्रासच मिटला

मुंबई : देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांना जोरदार झटका. होय, कंपनीने असे खास फिचर आणले आहे ज्याच्या मदतीने वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास बंद होणार आहे. रिचार्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी रिलायन्स जिओ आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने टेलिकॉम उद्योगासाठी UPI ऑटोपे घोषणा केली आहे. आता करोडो जिओ वापरकर्ते कोणत्याही त्रासाशिवाय स्वयंचलित रिचार्जसाठी UPI ऑटोपे सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

Advertisement

या सुविधेद्वारे, जिओ युजर्स MyJio अॅपवर UPI ऑटोपे वापरून त्यांच्या पसंतीच्या टॅरिफ प्लॅनसाठी ऑर्डर सेट करू शकतात आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा मोबाईल रिचार्ज करण्याचे टेन्शन राहणार नाही. या घोषणेसह, रिलायन्स जिओ ही आपल्या ग्राहकांसाठी अशी सेवा सुरू करणारी भारतातील पहिली दूरसंचार कंपनी ठरली आहे. जिओ युजर्सना त्यांच्या सध्याच्या प्लॅनची ​​मुदत संपत असल्याची आणि रिचार्जची काळजी करण्याची गरज नाही. UPI ऑटोपे मदतीने युजर्स रिचार्ज स्वयंचलित करू शकतात. या पद्धतीत आधीच्या प्लानची मुदत संपताच त्यांच्या मोबाइल नंबरद्वारे आधीच सिलेक्ट केलेल्या प्लानचे आपोआप रिचार्ज केले जाईल.

Advertisement

वापरकर्त्यांना 5 हजार रुपयांपर्यंतच्या रिचार्ज व्यवहारांसाठी UPI पिन टाकण्याचीही आवश्यकता नाही. युजर्स कधीही ऑटो-रिचार्ज बंद करू शकतात किंवा भविष्यात त्यांना रिचार्ज करू इच्छित असलेला प्लॅन बदलू शकतात. हे फिचर अनेक लोकांसाठी खूप उपयुक्त ठरेल. कारण, याद्वारे ते त्यांच्या पालकांचे आणि मुलांचे मोबाइल नंबर कोणत्याही त्रासाशिवाय रिचार्ज करू शकतील.

Loading...
Advertisement

मोबाईल रिचार्ज कधी संपत आहे याकडे आता लक्ष देण्याची गरज राहणार नाही. ही सुविधा फक्त कंपनीच्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठीच आहे. सर्व पोस्टपेड वापरकर्त्यांना मॅन्युअली रिचार्ज करत राहावे लागेल. Airtel आणि Vodafone Idea सह इतर खासगी दूरसंचार कंपन्या देखील आता Jio कडे असलेली अशीच सुविधा सादर करण्याचा विचार करत आहेत.

Advertisement

वाव.. जिओ, एअरटेलल कंपन्यांना मिळणार टक्कर.. ‘ही’ कंपनी प्लानमध्ये देतेय 2 GB डेटा फ्री; जाणून घ्या डिटेल

Advertisement
Advertisement

Leave a Reply