वाव.. ‘येथे’ सुरू होणार फळ-भाज्यांचे एसी दुकान.. सरकार देणार 75 टक्के अनुदान; पहा, कुणी सुरू केलीय ‘ही’ खास योजना
पाटणा : देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. राज्य सरकारेही यादृष्टीने कार्यवाही करत असतात. काही योजना सुरू केल्या जातात. अनुदानही दिले जाते. आता अशीच एक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत राज्य सरकार तब्बल 75 टक्क्यांपर्यंत अनुदान देणार आहे. कृषी विभागाच्या फलोत्पादन विभागांतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. फळे आणि भाजीपाल्याचे एसी दुकान सुरू करण्यासाठी बिहार सरकारकडून ही योजना सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मिशन अंतर्गत एसी रिटेल आऊटलेट सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंग यांनी दिली.
यास ‘फलोत्पादन उत्पादन विक्री केंद्र’ असे नाव देण्यात आले आहे. 9 एमटी साठवणूक क्षमता असलेली 12 बाय 12 फूट दुकान उभारणीसाठी हे अनुदान असणार आहे. या दुकानामध्ये लाल, पिवळा आणि हिरवा सिमला मिरची, चेरी टोमॅटो, बिया नसलेली काकडी, पिवळा आणि जांभळा फुलकोबी, लाल कोबी, ब्रोकोली, मशरूम आणि हायटेक नर्सरीमध्ये उत्पादित भाजीपाला विकता येणार असल्याचे कृषिमंत्री सिंग यांनी सांगितले.
जांभूळ,पेरू, केळी, स्ट्रॉबेरी, आंबा फळांची विक्री केली जाईल. बिहार राज्य बियाणे आणि सेंद्रिय प्रमाणपत्र असलेल्या भाज्यांची विक्री देखील केली जाईल. बिहार राज्य फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हानिहाय ओळखल्या गेलेल्या विशेष फलोत्पादन पिकांच्या मूल्यवर्धित उत्पादनाचाही समावेश करण्याचे नियोजन आहे. याशिवाय याच केंद्रातून विक्रीची व्यवस्था केली जाणार असल्याची माहीती यावेळी देण्यात आली.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत वैयक्तिक शेतकरी किंवा उद्योजकासाठी 50 टक्के आणि शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेती गटासाठी 75 टक्के अनुदान निश्चित करण्यात आले आहे. एकूण उभारणीसाठी जो खर्च येईल त्याच्या 75 टक्के रक्कम दिली जाणार असल्याचे कृषिमंत्री यांनी स्पष्ट केले. शेतकरी, शेतकरी गट, उद्योजक किंवा सार्वजनिक क्षेत्रातील घटक तसेच सहकारी संस्था, नोंदणीकृत संस्था इत्यादी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
शेतकरी आंदोलनाचा इफेक्ट..! ‘या’ राज्यात भाजपला जोरदार झटका; काँग्रेसचा दणदणीत विजय