Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कारवाल्यांसाठी महत्वाची बातमी..! आता कार होणार आधिक सुरक्षित; केंद्र सरकार ‘तो’ निर्णय घेण्याच्या विचारात

मुंबई : देशातील वाहने आधिक सुरक्षित करण्याचा सरकारचा उद्देश आहे. यासाठी सरकारने कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे आता चारचाकी वाहनांबाबत लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सर्व चारचाकी वाहनांसाठी दोन एअरबॅग्ज अनिवार्य करण्याची अंमलबजावणी केल्यानंतर, आता सर्व कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्याचा विचार सरकार करत आहेत.

Advertisement

अहवालात असे म्हटले आहे, की मागील सीटच्या प्रवाशांसाठी आणखी चार एअरबॅग जोडण्यासाठी अतिरिक्त खर्चा व्यतिरिक्त 8 हजार ते 9 हजार रुपये खर्च येईल. एअरबॅगची किंमत साधारणतः 1 हजार 800 रुपये असते आणि रचनेत बदल करण्यासाठी 500 रुपये खर्च येतो. मग, उपकरणे आणि अन्य खर्चात वाढ देखील अतिरिक्त असेल. उद्योगाच्या अंदाजानुसार, एंट्री-लेव्हल मॉडेलमध्ये 6 एअरबॅग्ज सादर केल्यामुळे त्यांची किंमत सुमारे 30 हजार रुपयांनी वाढेल. आणि देशातील मोठ्या बाजारपेठेचा विचार केला तर किंमतीत थोडासा बदल सुद्धा वाहनांच्या विक्रीवर परिणाम करतो, असा तर्क दिला जात आहे.

Loading...
Advertisement

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते, की प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व खासगी वाहन उत्पादकांना सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग्ज ठेवण्यास सांगितले आहे. एअरबॅग्स अनिवार्यपणे उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. हे पाऊल ग्लोबल NCAP च्या ‘सेफर कार्स फॉर इंडिया’ मोहिमेला समर्थन देते आणि देशात सुरक्षित मोटरिंग धोरणास प्रोत्साहन देते. खरे तर, अनेक विकसित बाजारपेठांमध्ये साइड एअरबॅग अनिवार्य फिटमेंट म्हणून उपलब्ध नाहीत परंतु क्रॅश चाचण्या आणि सुरक्षितता उपायांसाठी त्या आवश्यक ठरतात.

Advertisement
Advertisement

Leave a Reply