Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

घर-कार खरेदी सध्या नकोच..! म्हणून लोक टाळताहेत मोठा खर्च; पहा, नेमके काय म्हटलेय ‘त्या’ अहवालात

मुंबई : कोरोनाच्या संकटात लोकांना जसे आरोग्याचे महत्व समजले तसेच पैशांचेही गणित लक्षात आले. या काळात अनेक लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. लोकांचे उत्पन्नात मोठी घट झाली. त्यामुळे आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडले. कोरोनाचा त्रास अजूनही कायम आहे. आता तर कोरोना नव्या रुपात थैमान घालत आहे. अशा परिस्थितीत लोकांनीही शहाणपणाचे धोरण स्वीकारले आहे.

Advertisement

या वर्षी लोक कोणत्याही प्रकारचा मोठा खर्च टाळण्यासाठी नियोजन करत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. मालमत्ता खरेदी करण्यापासून ते कार खरेदी करण्यापर्यंत, लोक मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यास टाळाटाळ करतात. सर्वेक्षणानुसार, 80 टक्क्यांहून अधिक कुटुंबांनी या मताशी सहमती दर्शवली आहे. तथापि, सर्वेक्षण कंपनीचे संस्थापक सचिन टापरिया म्हणाले की, आर्थिक परिस्थितीवर ओमिक्रॉन प्रकारासह कोरोनाच्या लाटेचा परिणाम तात्पुरता आहे.

Advertisement

‘लोकल सर्किल’ या संस्थेने हा सर्व्हे केला. देशातील 47 हजार कुटुंबांचा या सर्वेक्षणात सहभाग होता. नवीन वर्षातील खर्चाबाबत प्रश्न विचारण्यात आले. लोकांनी व्यक्त केलेले मत धक्कादायक होते आणि हे स्पष्ट आहे की कुठेतरी कोरोना ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारामुळे लोकांच्या खरेदीच्या विचारांवर परिणाम झाला आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले, की 2022 मध्ये प्रत्येक 5 पैकी 4 कुटुंबांनी मालमत्ता किंवा चारचाकी वाहन खरेदी करण्यास नकार दिला.

Advertisement

या सर्वेक्षणादरम्यान 78 टक्के कुटुंबांनी सांगितले, की नवीन वर्षात दागिने खरेदी करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. म्हणजेच 2021 मध्ये भारतीय लोकांनी सोने खरेदीचा गेल्या दहा वर्षांचा विक्रम मोडीत काढला. तर 2022 मध्ये दागिन्यांची खरेदी करण्याचा कोणताही विचार नसल्याचे अनेकांनी सांगितले. सर्वेक्षणानुसार, सहभागी 47 हजार कुटुंबांपैकी केवळ 15 टक्के कुटुंबे अशी आहेत की ते स्वत: साठी काही मालमत्ता, नवीन कार किंवा दागिने बनवण्यासाठी खर्च करू इच्छित आहेत. सातपैकी एका कुटुंबाने निवासी मालमत्ता खरेदी करण्यासाठी होकार दिला. तर दुसरीकडे सहापैकी एका कुटुंबाने चारचाकी वाहन खरेदी करण्याची तयारी दर्शवली.

Loading...
Advertisement

कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे, सर्वेक्षणात सहभागी बहुतेक कुटुंबे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याबाबत जागरूक असल्याचे दिसून आले. सर्वेक्षणातून असे दिसून आले की, सुमारे 67 टक्के लोकांना त्यांचा आरोग्य विमा कायम ठेवायचा आहे. तथापि, यापैकी केवळ 15 टक्के कुटुंबांना त्यांच्या आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम वाढवायची होती.

Advertisement

2022 साठी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याची योजना आखत असलेल्या सहा टक्के कुटुंबे पेट्रोल कार खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या किरकोळ मागे आहेत. दुसरीकडे, डिझेल कारचा विचार केला तर केवळ तीन टक्के लोकांनी या नवीन वर्षात डिझेल कार घेण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. सर्वेक्षणानुसार, 40 टक्के लोक बचत ठेवी किंवा सोन्यात पैसे गुंतवण्याऐवजी स्टॉक आणि म्युच्युअल फंड खरेदी करण्याचा विचार करतात. याचे कारण असे की सर्वेक्षणात 20 टक्के लोक टियर-3 आणि 4 शहरे आणि ग्रामीण भागातील होते.

Advertisement

म्हणून देशभरात होणार आहे ‘ते’ सर्वेक्षण; पहा नेमके काय नियोजन केलेय केंद्र सरकारने

Advertisement
Advertisement

Leave a Reply