Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

देशात वाढतोय इलेक्ट्रिक वाहनांचा दबदबा; डिसेंबर महिन्यात केलाय ‘हा’ नवा विक्रम..

मुंबई : इंधनाचे दर भरमसाठ वाढल्याने लोकांनी आता इलेक्ट्रिक वाहनांचा विचार सुरू केला आहे. सरकारने या वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ व्हावी, यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या वाहनांसाठी सरकार अनुदान सुद्धा देत आहे. त्यामुळे देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी झाल्या आहेत. दुसरीकडे खासगी क्षेत्र सुद्धा सरकारला मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले आहे. परिणामी, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांना हळूहळू मागणी वाढत आहे. मागील वर्ष इलेक्ट्रिक वाहनांसाठी फायदेशीर ठरले आहे.

Advertisement

अनेक कंपन्यांनी दुचाकी ते इलेक्ट्रिक कारपर्यंत नवीन ऑफर दिल्या आहेत. JMK रिसर्च अँड अॅनालिटिक्सच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे, की डिसेंबर 2021 मध्ये पहिल्यांदाच इलेक्ट्रिक वाहन नोंदणीने एका महिन्यात 50 हजार युनिट्सचा टप्पा पार केला होता. डिसेंबर 2021 मध्ये एकूण वाहनांची विक्री 50 हजार 866 युनिट्स होती, जी डिसेंबर 2020 मध्ये नोंदवलेल्या संख्येपेक्षा 240 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत महिना-दर-महिना वाढ 21 टक्के झाली आहे.

Advertisement

डिसेंबर 2020 मध्ये संपूर्ण देशात एकूण 14 हजार 978 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये देशभरात ४२ हजार ०५५ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती. डिसेंबर 2021 मधील नोंदणी इलेक्ट्रिक दुचाकी आणि प्रवासी तीन चाकी वाहनांसाठी होती. जी एकत्रितपणे महिन्यातील एकूण नोंदणीपैकी 90.3 टक्के होती. एकूण नोंदणीपैकी 48.6 टक्के योगदान एकट्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे आहे. इलेक्ट्रिक कारचे योगदान 5 टक्के आणि इलेक्ट्रिक कार्गो तीन चाकी वाहनांचे योगदान 4.3 टक्के आहे.

Loading...
Advertisement

अभ्यासात असेही दिसून आले आहे, की डिसेंबर 2021 मध्ये उत्तर प्रदेश हे सर्वात जास्त इलेक्ट्रिक वाहने नोंदणीकृत राज्य होते. गेल्या महिन्यात एकूण नोंदणीपैकी 23 टक्के नोंदणी उत्तर प्रदेशमध्ये झाली होती. ज्यामध्ये 10 हजार युनिट्स होते. महाराष्ट्र (13 टक्के), कर्नाटक (9 टक्के), राजस्थान (8 टक्के) आणि दिल्ली (7 टक्के) अशी नोंदणी होती.

Advertisement

काम की बात : इलेक्ट्रिक स्कूटर घेताना ‘या’ 4 गोष्टी नक्की चेक करा; नुकसान होणार नाही

Advertisement
Advertisement

Leave a Reply