Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

9 पेक्षा जास्त सिमकार्ड असतील तर, 7 जानेवारीआधी करा ‘हे’ काम; नाहीतर होईल नुकसान

मुंबई : दूरसंचार विभागाने (DoT) मागील वर्षात 7 डिसेंबर रोजी एक नवीन आदेश जारी केला होता. त्यामध्ये म्हटले होते, की 9 पेक्षा जास्त सिम कार्ड असलेल्या वापरकर्त्यांना सिम कार्ड पडताळणी करणे अनिवार्य आहे. हा नियम 7 डिसेंबर रोजी लागू करण्यात आला होता आणि नियम लागू झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत पडताळणी करणे आवश्यक आहे. यासाठी 6 जानेवारी अंतिम मुदत आहे. या काळात सिम कार्ड पडताळणी करणे आवश्यक राहणार आहे. अन्यथा, सिम कार्ड बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement

जर तुमच्या नावावर 9 पेक्षा जास्त सिम नोंदणीकृत असतील तर तुम्हाला आधी सिम व्हेरिफिकेशन करावे लागेल. 7 जानेवारीपूर्वी तुम्ही हे केले नाही, तर आउटगोइंग सेवा बंद केली जाईल. याबरोबरच 45 दिवसांत इनकमिंग कॉल सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर तुम्ही सिमकार्ड वापरत नसाल तर सिम सरेंडरचा पर्यायही देण्यात आला आहे. पडताळणी न केल्यास 60 दिवसांत सिमकार्ड बंद करण्याचे आदेश आहेत. आजारी, आंतरराष्ट्रीय रोमिंग आणि दिव्यांग व्यक्तींना 30 दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल.

Loading...
Advertisement

बँक, कायद्याची अंमलबजावणी किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेकडून मोबाईल क्रमांकाबाबत तक्रार आल्यास वापरकर्त्याच्या सिमकार्डवरील आउटगोइंग कॉल सेवा 5 दिवसांच्या आत बंद केली जाईल. त्याच वेळी, इनकमिंग कॉल सेवा 10 दिवसांत बंद होईल. म्हणजेच 15 दिवसात सिम कार्ड पूर्णपणे बंद होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

मोदी सरकारने घेतलाय मोठा निर्णय… सिम कार्ड घेणं झालं सोपं…वाचा कसं…

Advertisement
Advertisement

Leave a Reply