पुढील महिन्यात येणार तेलाचा ‘सुकाळ’..! म्हणून ‘ते’ देश कच्च्या तेलाचे उत्पादनात करणार वाढ.. जाणून घ्या, काय होतील परिणाम ?
मुंबई : तेल उत्पादक देशांनी फेब्रुवारीपासून तेलाचे उत्पादनात वाढ करणार असल्याचे सांगितले आहे. मंगळवारी, कोलिशन ऑफ ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीजने सांगितले की, कोविड ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारांचा प्रसार होऊनही त्यांना इंधनाची मागणी वाढेल असे अपेक्षित आहे. म्हणून ते उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेत आहेत.
फेब्रुवारीमध्ये दररोज 4 लाख बॅरल अधिक उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, ओमिक्रॉनच्या वेगाने होणाऱ्या प्रसारामुळे नोव्हेंबरच्या अखेरीस कच्च्या तेलात मोठी घसरण झाली होती, मात्र आता किंमती सुधारत आहेत. अशा परिस्थितीत सर्वत्र ओमिक्रॉनची चर्चा सुरू असतानाच इंधनाच्या मागणीतही रिकव्हरी होत असल्याने आगामी काळात मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ओपेक देश आता त्यांचे उत्पादन पुन्हा जुन्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना काळात इंधनाची मागणी कमी झाल्यानंतर तेल उत्पादक देशांनी उत्पादनात मोठी कपात केली होती. आता किमती वाढत असताना जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्थांकडून उत्पादन वाढ करुन किमतींवर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे.
अमेरिका आणि इतर तेल वापरणार्या देशांनी किमतीतील वाढ स्थिर ठेवण्यासाठी नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांच्या धोरणात्मक साठ्यातून क्रूडचा पुरवठा केला. ज्यामुळे किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली. जरी या निर्णयाचा दीर्घकालीन प्रभाव नसला तरी तो घसरण्याचा अंदाज आहे, त्यानंतर देशांनी आता तेल उत्पादन वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कच्च्या तेलाच्या दरात तेजी दिसून येत आहे.
सध्या ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 80 डॉलरच्या पुढे गेले आहे. एक महिन्यापूर्वी ब्रेंट प्रति बॅरल 73 डॉलरच्या पातळीवर होता. 20 डिसेंबर रोजी किमती प्रति बॅरल 72 डॉलरपेक्षा कमी झाल्या होत्या. त्यानंतर दरात 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे दर आणखी वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.