Take a fresh look at your lifestyle.

Blog माहिती पैशांची : ‘तसल्या’ लुटीच्या अड्ड्यात अजिबात गुंतू नका.. नाहीतर..

एखादी कंपनी मार्केटमध्ये येते, काही काळात चांगला जम बसवते, हळूहळू त्यात मोठमोठ्या कंपन्यांची आणि प्रसिद्ध लोकांची गुंतवणूक असल्याचे लक्षात यायला लागते, काही काळाने तिच्या सक्सेस स्टोरी ऐकायला यायला लागतात, कंपनीबद्दल नवनवीन गोष्टींच्या बातम्या सतत कानावर पडायला लागतात. मग टप्पा येतो कंपनी शेअर मार्केटध्ये लिस्ट करण्याचा.. आणि मग पुढे काय होते आणि वाढून ठेवलेले असते हे आपणही अनेकजण जाणून आहोत. सध्या शेअर बाजारात नव्या कंपन्या येऊन गुंतवणूक मिळवत आहेत. अशावेळी बिजनेस कन्सल्टंट श्रीकांत आव्हाड (पुणे) यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये सर्वांना सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांंच्या फेसबुक खात्यावरून सदर लेख जसाच्या तसा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. Shrikant Avhad | Facebook

Advertisement

गुंतवणुकी संबंधीचे वेगवेगळे ब्लॉग हि कंपनी कशी गेमचेंजर आहे हे सांगणारे लेख लिहायला लागतात. वेगवेगळे अर्थविषयक न्यूज चॅनेल्स कंपनीबद्दल सगळं काही उज्ज्वल भविष्य आपल्या समोर मांडायला लागतात. लोकांमध्ये कंपनीच्या लिस्टिंगबद्दल उत्सुकता वाढायला लागते. हि उत्सुकता वाढती रहावी म्हणून हे ब्लॉगर्स, फायनान्स चे न्यूज चॅनल्स आणि न्यूज पेपर्स सतत कंपनीबद्दल नवनवीन गोष्टी सांगत राहतात. मोठ्या प्रमाणात लिस्टिंग होते. कंपनीची मार्केटमध्ये दमदार एंट्री होते, एकाच दिवसात कंपनीचं मार्केट कॅपिटल १ लाख कोटी होतं. सगळीकडे जाल्लोश असतो, न्यूज चॅनेल्स तर दिवाळी साजरी करत असतात, काहीजण तर आजचा दिवस भारतीय शेअर मार्केटमध्ये हा दिवस ऐतिहासिक म्हणून नोंद झाला आहे असले डायलॉग मारतात, आणि दोन दिवसात धपकन सगळं आपटतं. वर्षभरापूर्वी शेअर मार्केट शिकलेल्या आणि त्यात तज्ञ झालेल्या नवगुंतवणूकदारांना काय झालंय हे कळेपर्यंत पाच वर्षांपूर्वी ५ हजार कोटी गुंतवणारी कंपनी ८०-९० हजार कोटी भांडवल घेऊन कंपनीच्या बाहेर पडलेली असते. आणि कंपनीकडे आता फक्त १० हजर कोटीच राहिलेले असतात, तेही लॉस कव्हर करण्यात जाणार असतात. मग हा सगळा खटाटोप कशासाठी? आणि लोकांनी जे पैसे गुंतवले ते कुठे गेले?

Advertisement

टिपिकल पॅटर्न आहे. स्टार्टअप फंडींगच्या किंवा एंजल इन्व्हेस्टमेंट च्या नावाखाली देशातल्या किंवा बाहेरच्या (खास करून चीन च्या) मोठ्या कंपन्या, मोठमोठे सेलिब्रिटी किंवा मोठे व्हेंचर कॅपिटॅलिस्ट नवख्या स्टार्टअप मध्ये पैसे गुंतवतात. हजारो कोटी गुंतवले जातात. या स्टार्टअप ला प्रसिद्धी मिळविण्यासाठी आपले सगळे कौशल्य पणाला लावतात. कंपन्या आपली संपूर्ण मार्केटिंग टीम या स्टार्टअप ला प्रसिद्ध करण्यासाठी कामाला लावते. न्यूज चॅनेल्स, ब्लॉगर्स, वर्तमानपत्रे अशा सगळ्यांना कामाला लावलं जातं. आकडे फुगवून सांगितले जातात. उलाढाल मोठी दाखवली जाते. हि उलाढाल दाखवताना तोटा अलगद झाकला जातो. तो तोटा तात्पुरता आहे हे वेगवेगळ्या माध्यमातून सतत सांगितले जाते. यामुळे त्या तोट्याचं गांभीर्य संपून जातं. हि कंपनीसुद्धा अशी असते कि जिचा फिजिकल सेटअप खूपच कमी असतो, सगळं काही ऑनलाइनच चालू असतं. पण तरी उलाढाल मात्र हजारो कोटींची दिसत असते. आणि त्याच्या बातम्या सतत कानावर आदळत असतात. दोन तीन वर्षे झाल्यावर आता त्या कंपनीमधून हजार कोटीचे लाखभर कोटी करून तो पैसा घेऊन बाहेर पडण्याची वेळ झालेली असते. मग वेळ येते शेअर मार्केटमध्ये कंपनी लिस्ट करण्याची. IPO नावाचा सध्या ट्रेंड आहे. या ट्रेंड मध्ये मग कंपनी आपला IPO आणते.

Advertisement

सामान्यपणे IPO का आणला जातो ? तर कंपनीच्या पुढच्या डेव्हलपमेंट प्लॅन साठी पैसा उभा करण्यासाठी. या पैशातून कंपनी पुढची डेव्हलपमेंट करणार असते. पण इथं मात्र वेगळाच कारभार असतो. इथे पैसा उभा करण्याचा प्लॅन असतो तो त्या एंजल इन्व्हेस्टर ला देण्यासाठी. म्हणजे, समजा कंपनी मार्केटमधून १ लाख कोटी उभे करणार असेल तर ते कशासाठी करायला पाहिजेत? तर नवीन ब्रँच उघडायच्या आहेत, कंपनी एक्स्पान्शन करायचं आहे, मार्केट डेव्हलपमेंट करायचे आहे, काही सेटअप उभारण्याचे आहेत, युनिट्स उभारायचे आहेत, डिस्ट्रिब्युशन चॅनेलचा विस्तार करायचा आहे अशा कामांसाठी, पण इथे हा पैसा का घेतला जतो? तर तीन वर्षांपूर्वी ज्या कंपनीने ५ हजार कोटी दिले होते त्या कंपनीला या एक लाख कोटीमधले ७० हजार कोटी द्यायचे आहेत म्हणून. आणि उरलेले ३० हजार कोटी? त्यातले २० हजार कोटी कंपनीचा तोटा कव्हर करण्यासाठी वापरणार असतात. आणि १० हजार कोटी फक्त कंपनीच्या प्रत्यक्षपणे हातात असतात असतात. म्हणजे कंपनीने कोणतंच विशेष भांडवल उभं केलेलं नसतं. कंपनीने फक्त लोकांकडून पैसा घेऊन तो लगेच बाहेर सुद्धा काढलेला असतो. कंपनीचं खरं मार्केट कॅपिटल १० हजार कोटींचं असतं, कंपनीची पात्रात तेवढीच असते, पण कॅम्पेनिंग च्या बळावर कंपनी लोकांकडून लाखभर कोटी उभे करते आणि त्यातले ७०% रक्कम घेऊन मूळ गुंतवणूकदार बाहेर पडतात. कंपनीकडे पैसा राहिलेला नसतोच, त्यामुळे डेव्हलपमेंट ला विशेष स्कोप नसतोच. मग हळूहळू शेअर्स सुद्धा आपटायला लागतात. गुंतवणूकदार कसेबसे बाहेर पडायला लागतात. कंपनी मागच्या पाच वर्षात जेवढ्या वेगाने प्रकाशझोतात झलेली असते, त्यापेक्षाही जास्त वेगाने ती गायब सुद्धा होऊन जाते.

Advertisement

इथे टेक्निकली कोणतीच फसवणूक नसते, हा प्रकार कायद्याच्या कचाट्यात अडकू सुद्धा शकत नाही, म्हणून याला कायदेशीर लूट म्हणतात. SEBI म्हणते आमचं काम फक्त रेग्युलरायझेशनचं आहे. सगळं काही नियमाप्रमाणे आहे कि नाही हे फक्त आम्ही पाहू शकतो. त्यांचही बरोबर आहे. पण जे चालू आहे ते योग्य मार्गाने चालू आहे कि नाही हे कोण सांगणार? त्यात असा काही कायदेशीर झोल असेल तर त्यावर कोण बोलणार? यासाठी कोणतीही सरकारी एजन्सी का नाहीये, याच उत्तर मात्र SEBI देत नाही. हे सगळे प्रकार मागच्या ५-७ वर्षात वाढले आहेत. दहाएक वर्षांपूर्वी ज्याने कुणी आपल्या कंपनीचा IPO आणला असेल तो आता तळतळ करत असेल कि दोन तीन वर्षे थांबले असतो तर एखाद्य चांगल्या व्हेन्चर कॅपिटॅलिस्ट ला हाताशी धरून आठ दहा पट जास्त पैसे काढले असते. भले नंतर १०० चा शेअर २ वर का येईना, आपल्या खात्यात तर हजारो कोटी जमा झाले असते. लुटीचे अड्डे आपण आपलेच ओळखायचे असतात. कारण कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही याची काळजी यांनी आधीच घेतलेली असते. (www.facebook.com/ShrikantAvhad91)

Advertisement
Advertisement

Leave a Reply