काम की बात : इलेक्ट्रिक स्कूटर घेताना ‘या’ 4 गोष्टी नक्की चेक करा; नुकसान होणार नाही
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्याने इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढली आहे. कारण, इंधनाचे दर इतके वाढले आहेत की लोकांसमोर दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने मार्केटमध्ये आणली आहेत. मात्र, असे असले तरी वाहनांच्या श्रेणी आणि दर्जाबाबत कंपन्यांनी केलेले दावे 100 टक्के खरे आहेत का, तुम्ही ई-स्कूटर किंवा कोणतेही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार असाल तर हा प्रश्न नक्कीच लक्षात ठेवा, त्यानुसार तपासणी करा, म्हणजे तुमचे नुकसान होणार नाही.
इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ पूर्णपणे नवीन असल्याने आणि त्यावर संशोधन सुरू असल्याने कंपन्यांचे म्हणणे काहीच विचार न करता स्वीकारणे योग्य ठरणार नाही. ई-स्कूटर किंवा ई-कार खरेदी करण्याचा प्लॅन बनवल्यानंतरच काही महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या पाहिजेत असे तज्ज्ञ सांगतात.
आधी असे म्हटले जात होते की ई-स्कूटर प्रभावी ठरणार नाहीत कारण या वाहनांची रेंज खूप कमी आहे. मात्र आता ही तक्रार काही प्रमाणात दूर झाली आहे. अशा अनेक स्कूटर आहेत ज्या एका चार्जवर 100 किलोमीटर पर्यंत चालतात. परंतु उद्योगाशी संबंधित एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की इलेक्ट्रिक वाहनांच्या कंपन्या सुमारे 30 टक्क्यांनी रेंज वाढ करतात. त्यामुळे रेंज पाहता ई-स्कूटर खरेदी करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा.
दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे बॅटरीचे आयुष्य. कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनाची रेंज थेट त्याच्या बॅटरीशी संबंधित असते. लिथियम-आयन किंवा लीड बॅटरीमध्ये सामान्यत: 300-500 चार्जचा दावा केला जातो. जर बॅटरी खूप चांगली असेल तर ती 1000 पर्यंत चार्ज होऊ शकते. नेहमी लक्षात ठेवा की बॅटरी कालांतराने कोणतीही अडचण देऊ नये कारण यामुळेच तुमच्या स्कूटरची देखभाल निश्चित होईल. फक्त अशीच स्कूटर खरेदी करा ज्याची बॅटरी दीर्घकाळ टिकेल.
तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता, तेथील रस्त्यानुसार स्कूटरचा दर्जा पाहावा लागतो. टायर आणि अलॉय व्हील पाहूनच ई-स्कूटर घ्या. स्कूटर 25 किमी प्रतितास ते 75 किमी प्रतितास या वेगाने येतात. तुमचे बजेट आणि प्रवासाचे अंतर यावर आधारित मॉडेल निवड करा. खरेदीचा निर्णय घेताना वाहनाची किंमत हा नेहमीच महत्त्वाचा घटक असतो. नवीन तंत्रज्ञान आणि रिचार्जेबल बॅटरीमुळे खरेदी किंमत जास्त आहे. मात्र, कालांतराने ते पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत स्वस्त असल्याचे सिद्ध होईल.
वाव.. इलेक्ट्रिक कार घेण्यासाठी मिळणार 3 लाख रुपये; पहा, कुणी सुरू केलीय ‘ही’ भन्नाट योजना