Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : आरोग्य विम्यातून ओमिक्रॉनवर उपचारांबाबत ‘IRDAI’ ने दिलेत महत्वाचे आदेश, जाणून घ्या..

मुंबई : देशात ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट आधिक संसर्गजन्य आहे. तरी देखील याआधीच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत कमी घातक असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्ण गंभीर होत नसला तर उपचारासाठी दवाखान्यात जावे लागत आहे. त्यामुळे ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांना त्यांनी ज्या कंपनीचा आरोग्य विमा घेतला आहे, ती कंपनी आरोग्य विम्याचे पैसे देणार की नाही, याबाबत इरडाने महत्वाचे आदेश दिले आहेत.

Advertisement

ज्या लोकांनी आरोग्य विमा पॉलिसीमध्ये कोरोना उपचाराच्या पॉलिसी काढल्या आहेत, त्यांना ओमिक्रॉनचे संक्रमण झाले तरी उपचाराचा खर्च विम्यातून कव्हर केला जाणार आहे. इरडाने यासंबंधीचे आदेश विमा कंपन्यांना दिले आहेत. सर्वसामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांनी ज्या विमाधारकांना कोरोना उपचाराच्या पॉलिसी दिल्या आहेत, त्यांना ओमिक्रॉनच्या उपचारावर विमा संरक्षण द्यावे, असे म्हटले आहे. सध्या देशभरात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे इरडाने हे आदेश दिले आहेत.

Advertisement

इरडाने याआधी सन 2020 मध्ये असे म्हटले होते, की जो पॉलिसीधारक दवाखान्यात गेल्यानंतर त्याचा खर्च देतो त्या सर्व पॉलिसीमध्ये कोरोनाचे उपचारही कव्हर करावेत. सुरुवातीच्या काळात अनेक कंपन्या कोरोनावरील उपचार त्यांच्या पॉलिसीत बसत नसल्याचे कारण देत खर्च देण्यास तयार होत नव्हत्या. आता मात्र निम्मा खर्च देत आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, जगभरात कोरोनाने परिस्थिती गंभीर बनली आहे. अमेरिका, युरोपमध्ये तर कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. येथे दररोज लाखोंच्या संख्येत रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळेे या देशांमध्येही कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. देशातही कोरोनाचा वेग वाढत आहे, तसा दैनंदीन घडामोडींवर त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येऊ लागला आहे. सरकारने अद्याप लॉकडाऊनचा विचार केला नसला तरी निर्बंध मात्र कठोर केले आहेत. तर दुसरीकडे कार्पोरेट विश्वानेही या संकटाचा धसका घेतला आहे. कंपन्यांनी पुन्हा वर्क फ्रॉम होन पद्धतीचा विचार सुरू केला आहे. तर काही कंपन्यांनी या पद्धतीने कामकाजास सुरुवातही केली आहे.

Advertisement

बाब्बो.. कोरोनाचा जबरदस्त उद्रेक.. एकाच दिवसात तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण; पहा, कुठे आलेय ‘हे’ संकट ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply