Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. ‘त्या’ पद्धतीने देशात घडलेत कोट्यावधींचे व्यवहार; जाणून घ्या, महत्वाची माहिती, नॉलेज होईल अपडेट

मुंबई : कोरोना काळात देशात डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. कोरोनामुळे हे शक्य झाले आहे. कारण, या काळात ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत होते. देशात इंटरनेटचे वापरकर्ते मोठ्या संख्येने आहेत. सुमारे 1 अब्ज डेबिट, क्रेडिट कार्ड, 2.25 अब्ज प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स आणि अनेक नवीन पेमेंट पद्धतींसह देश सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या डिजिटल पेमेंट मार्केटपैकी एक बनणार आहे. आताही देशात UPI व्यवहारांनी याआधीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. डिसेंबर महिन्यात UPI द्वारे तब्बल 456 कोटी व्यवहार करण्यात आले.

Advertisement

या व्यवहारांची एकूण किंमत 8.27 लाख कोटी रुपये इतकी जबरदस्त आहे. आतापर्यंत हा सर्वाधिक आकडा आहे. याआधी ऑक्टोबर 2021 मध्ये युपीआयद्वारे 421 कोटी व्यवहार झाले होते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2021 मधील व्यवहार डिसेंबर 2020 मधील व्यवहारांच्या तुलनेत 9 टक्क्यांनी जास्त आहेत. किंमतीबाबत विचार केला तर डिसेंबर 2020 च्या तुलनेत 7.6 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. 2021 या संपूर्ण वर्षात 3800 कोटी युपीआय व्यवहार देशभरात झाले आहेत.

Loading...
Advertisement

युपीआयद्वारे व्यवहारांची संख्या मागील चार वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या चार वर्षात युपीआय व्यवहार तब्बल 70 पटीने वाढले आहेत. मात्र, या काळात डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारात घट झाली आहे. कार्ड व्यवहाराच्या तुलनेत UPI व्यवहार 8 पटीने जास्त आहेत. देशात आजमितीस फोन पे, गुगल पे, पेटीएम यांसारखे UPI प्लॅटफॉर्म आघाडीवर असून याद्वारे मोबाइल रिचार्जपासून ते विमा पॉलिसी खरेदी करण्यापर्यंत अनेक व्यवहार या माध्यमातून करता येऊ शकतात.

Advertisement

वाव.. डिजिटल पेमेंटमध्ये मिळालीय आघाडी; पहा, चीन आणि अमेरिका कुठे आहेत..

Advertisement
Advertisement

Leave a Reply