Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काम की बात : विमा आहे महत्वाचा.. पहा, कोणत्या प्रकारचे विमा आहेत गरजेचे; जाणून घ्या, महत्वाची माहिती

मुंबई : कोरोना आजाराच्या संकटात लोकांना आरोग्याचे महत्व चांगलेच समजले आहे. या काळात आरोग्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येकाला हा खर्च करणे शक्य नाही. त्यामुळे आरोग्य विम्यात मोठी वाढ झाली आहे. विमा खरेदी करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढली आहे. विमा कंपन्यांच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. त्यांनीही विमा दरात वाढ केली आहे.

Advertisement

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत विशेषत: आर्थिक परिस्थितीत विमा हा एक मजबूत आधार आहे. विमा आपल्या कुटुंबाला भविष्यात कोणत्याही संकटास तोंड देण्याचे सामर्थ्य देत असताना, बचतीचा मोठा आधार देखील आहे. बरेच लोक फक्त बचतीसाठी विमा पॉलिसी घेतात. मात्र येथे आपण हे समजून घेतले पाहिजे की गुंतवणूक आणि विमा या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. गुंतवणुकीसाठी विमा उतरवून, तुम्हाला अपेक्षित परतावा मिळत नाही. विमा बाजारही विस्तारला आहे. आज प्रत्येक गोष्टीचा विमा उतरवला जात आहे. आरोग्य आणि सामान्य विम्यात शेकडो प्रोडक्ट्स आहेत. परंतु, आपण येथे अशा विमा प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत, जे कुटुंबासाठी गरजेचे आहेत.

Advertisement

कोरोनाच्या काळात आरोग्याच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य विमा असणे खूप गरजेचे बनले आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विमा असणे काळाची गरज आहे. फॅमिली फ्लोटर विम्यामध्ये संपूर्ण कुटुंब सुद्धा समाविष्ट केले जाऊ शकते. चांगल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये डॉक्टरांचे मार्गदर्शन शुल्क, वैद्यकिय तपासण्या, दवाखान्यातील औषधांचा खर्च, ऑपरेशन्स या बाबींचा खर्च असतो.

Advertisement

जर तुमच्याकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन असेल तर वाहनाचा विमा असणे गरजेचे आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्ससोबत सर्वसमावेशक मोटर विमा संरक्षण घेणे योग्य ठरेल. या विम्याचे दरवर्षी नुतनीकरण करावे लागते.

Loading...
Advertisement

आजकाल नैसर्गिक संकटे वाढली आहेत. चोरीच्या घटनाही घडत असतात. अशा परिस्थितीत गृह विमा असणे महत्वाचे ठरते. गृह विम्याद्वारे आग, चोरी, नैसर्गिक आपत्तींद्वारे होणारे नुकसान भरुन काढता येते.

Advertisement

सध्याच्या काळात सायबर फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे सायबर विमा संरक्षण घेणे फायद्याचे ठरेल.

Advertisement

आरोग्य विमा घेताना ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच; नुकसान होणार नाही; जाणून घ्या, महत्वाची माहिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply