Take a fresh look at your lifestyle.

‘ई श्रम’ कार्डचे फायदे अनेक; जाणून घ्या, नोंदणी करण्यासाठी महत्वाची माहिती..

नवी दिल्ली : देशात असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी आहे. केंद्र सरकारने या कामगारांसाठी एक चांगला उपक्रम सुरू केला आहे. या कामगारांची ऑनलाइन नोंदणी करुन त्यांना ई श्रम कार्ड देण्यात येत आहे. या कार्डच्या माध्यमातून कामगार वर्गास अनेक फायदे मिळणार आहेत, तसेच सरकारी योजनांचाही लाभ मिळणार आहे. यामध्ये ई-श्रमिक कार्डधारकांना 2 लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळते. हे कार्ड तयार झाल्यानंतर मजुरांना रोजगार मिळण्याची शक्यता लक्षणीय वाढते.

Advertisement

कार्डच्या मदतीने कामगार भारत सरकारच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ घेऊ शकतात. आतापर्यंत कोट्यावधी कामगारांनी नोंदणी केली आहे, तरी देखील अजून अनेक कामगार असे आहेत की ज्यांची नोंदणी झालेली नाही. नोंदणी करण्याची पद्धत सोपी आहे. त्याबद्दल जाणून घेऊ या..

Advertisement

ई श्रमिक कार्ड बनवण्‍यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला ई श्रम पोर्टल eshram.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला होमपेजवर Register on E Shram या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुमच्या स्क्रीनवर नोंदणी फॉर्म उघडेल.

Advertisement

या पेजवर तुम्हाला तुमचे आधार कार्ड, ईपीएफओ, ईएसआयसी सदस्य स्थिती आणि कोडसह नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर मोबाईल नंबरवर OTP पाठवण्याच्या पर्यायावर क्लिक करा. काही वेळाने तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP येईल, जो तुम्हाला बॉक्समध्ये टाकून नोंदणी पर्यायावर क्लिक करावे लागेल.

Advertisement

यानंतर तुमची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी होईल. त्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये तुमचे सर्व आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरावे लागतील. फॉर्म भरल्यानंतर, तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे वेबसाइटवर अपलोड करा. यानंतर तुमचा फॉर्म यशस्वीपणे स्वीकारला जाईल.

Advertisement

काम की बात : ‘ई-श्रम’ कार्डचे फायदे अनेक; कामगारांसाठी आहे महत्वाचे; जाणून घ्या, महत्वाची माहिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply