महत्वाची बातमी : ‘या’ दिग्गज कंपनीचे स्मार्टफोन्स 4 जानेवारीपासून होणार बंद; पहा, नेमके काय म्हटलेय कंपनीने
मुंबई : काही काळाआधी ब्लॅकबेरीच्या फोनची एक वेगळीच क्रेझ होती. आता मात्र हे फोन सहसा कुठे दिसत नाहीत. सध्या मोबाइल दुनियेत चीनी कंपन्यांचा दबदबा आहे. आता या फोनबाबत एक महत्वाची बातमी मिळाली आहे. 4 जानेवारीपासून ब्लॅकबेरी फोन निरुपयोगी ठरणार आहे. पुढील आठवड्यात फोनची जवळपास सर्व फिचर बंद होतील. ब्लॅकबेरीने काही वर्षांपूर्वी आपले लोकप्रिय QWERTY कीपॅड आणि ब्लॅकबेरी ओएस असलेले फोन तयार करणे बंद केले होते. मात्र, त्याचा सॉफ्टवेअर सपोर्ट अजूनही दिला जात होता. आता मात्र कंपनी ब्लॅकबेरीओएस फोनचा सपोर्ट आधिकृतपणे बंद करणार असल्याची माहिती आहे.
ब्लॅकबेरी 7.1 ओएस आणि त्याआधीच्या ओएस तसेच ब्लॅकबेरी 10 सॉफ्टवेअरवर चालणाऱ्या ब्लॅकबेरी फोन्सना यावर्षात लेगसी सेवा मिळणार नाही. त्यामुळे आता हे फोन पूर्ण बंद होणार आहे. फोन कॉल तसेच मेसेज सुद्धा करता येणार नाहीत. कंपनीनेच ही माहिती एका ब्लॉगपोस्ट द्वारे दिली आहे. यानंतर पुढे काय याबाबत मात्र काही माहिती मिळालेली नाही. मात्र, कंपनी अँड्ऱ़ॉइडवर लक्ष केंद्रीत करू शकते. कंपनीने आधिकृत काही माहिती दिलेली नाही.
दरम्यान, जगभरात चीनी स्मार्टफोन कंपन्यांचा दबदबा आहे. अनेक देशांतील मार्केट या मोबाइल कंपन्यांनी काबीज केले आहे. त्यामुळे मोबाइल म्हटला की चीनचाच.. असे समीकरण तयार होत आहे. जगातील अनेक दिग्गज कंपन्यांच्या मोबाइलच्या तुलनेत चीनी कंपन्यांच्या फोनला जास्त मागणी असते. त्यामुळेच तर शाओमी, ओप्पो, व्हीवो, रियलमी यांसारख्या चायनीज कंपन्या चांगली कामगिरी करत आहेत.
भारतात चायनीज कंपन्यांची जबरदस्त क्रेझ आहे. तसेच सॅमसंगच्या फोनलाही चांगली मागणी आहे. त्यामुळेच तर या कंपन्यांचे मोबाइल हातोहात विकले जातात. चिनी स्मार्टफोन कंपन्यांनी भारताच्या बाजारपेठेतील 79 टक्के हिस्सा काबीज केला आहे. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक 10 चिनी स्मार्टफोनपैकी 8 स्मार्टफोन विकले गेले आहेत. सध्या भारतात शाओमी कंपनी आघाडीवर आहे. देशातील आघाडीच्या 5 कंपन्यांमध्ये सॅमसंग वगळता बाकी 4 कंपन्या चीनच्या आहेत. जगभरात चीनी कंपन्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे अन्य मोबाइल कंपन्यांना बाजारात टिकून राहण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
काम की बात : किती ‘GB’ चा स्मार्टफोन असतो सर्वात बेस्ट..? ; जाणून घ्या, माहिती, नॉलेज होईल अपडेट..