Take a fresh look at your lifestyle.

पेन्शनवाल्यांसाठी गुड न्यूज; पहा मोदी सरकारकडून काय मिळणार आहे गिफ्ट..!

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना मोठी भेट देण्याची तयारी केली आहे. नव्या निर्णयानुसार किमान पेन्शन वाढवण्याच्या दिशेने सरकार काम करत असून किमान मासिक पेन्शन जी सध्या फक्त 1000 रुपये आहे, त्यांना याचा फायदा होणार आहे. त्यानुसार किमान 9000 रुपयांपर्यंत पेन्शन वाढवणे अपेक्षित आहे. पेन्शनधारकांच्या मागणीवरूनच केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. निवृत्ती वेतनात वाढ करावी, अशी त्यांची अनेक दिवसांपासून मागणी होती. याबाबत फेब्रुवारीमध्ये कामगार मंत्रालयाची महत्त्वपूर्ण बैठक होऊ शकते आणि या बैठकीत संसदेच्या स्थायी समितीच्या शिफारशींवर हा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. कामगार मंत्रालयाच्या या बैठकीत नव्या वेतन संहितेबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो, असे नवभारत टाईम्सच्या बातमीत म्हटलेले आहे.

Advertisement

मार्च 2021 मध्ये संसदेच्या स्थायी समितीने किमान पेन्शन 1000 रुपयांवरून 3000 रुपये करण्याची मागणी केली होती. मात्र, ती वाढवून किमान 9000 रुपये करावी, अशी निवृत्ती वेतनधारकांची मागणी आहे. आतापर्यंत 5 राज्यांच्या उच्च न्यायालयानेही पेन्शन हा मूलभूत अधिकार असल्याचे म्हटले आहे. EPFO अंतर्गत पीएफ मिळविणारे सर्व लोक कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत येतात. वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त झाल्यावर त्यांना किमान 1000 रुपये प्रति महिना पेन्शन दिले जाते. मात्र, यासाठी कर्मचाऱ्याने किमान 10 वर्षे सरकारी सेवेत काम केलेले असणे आवश्यक आहे. या योजनेत व्यक्तीच्या मृत्यूनंतर विधवा पेन्शन आणि मुलांची पेन्शन सुविधाही दिली जाते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply