Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. आधी केली दरवाढ आता आणल्यात ‘कॅशबॅक’ ऑफर; ‘एअरटेल’, ‘जिओ’ने ‘अशी’ केलीय आयडीया..

मुंबई : टेलिकॉम कंपन्यांनी एकीकडे त्यांचे प्रीपेड रिचार्ज प्लान दरवाढ केली आहे तर दुसरीकडे विविध प्रकारच्या ऑफर्स आणत आहेत. Airtel आणि Jio ने अशा काही ऑफर आणल्या आहेत, ज्यामध्ये युजर्सना कॅशबॅक देण्यात येत आहेत. चला तर मग जाणून घेऊ या, या दोन कंपन्यांनी कोणत्या ऑफर लाँच केल्या आहेत. आणि युजर्सना कसा फायदा होणार आहे.

Advertisement

एअरटेल कंपनी आपल्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB डेटा देत आहे. याशिवाय अमर्यादित कॉल आणि 100 एसएमएस दररोज उपलब्ध आहेत. या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. याबरोबरच Amazon Prime Video Mobile Edition चे 1 महिन्याचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. कंपनीच्या 719 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा दिला जात आहे. त्याची वैधता 84 दिवस आहे. यामध्ये दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉल सुविधा उपलब्ध आहे.

Advertisement

एअरटेलच्या 839 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जात आहे. याशिवाय अमर्यादित कॉल आणि 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. एअरटेल थँक्स अॅपद्वारे हे रिचार्ज रिचार्ज केल्यावर 40 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.

Loading...
Advertisement

Jio च्या 719 रुपयांच्या रिचार्जमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा दिला जात आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100SMS आणि अनलिमिटेड कॉल सुविधा दिली जात आहे. या प्लानमध्ये Jio Mart चा 20 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. जिओच्या 666 रुपयांच्या रिचार्जमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100SMS आणि अनलिमिटेड कॉल सुविधा दिली जात आहे. या प्लानमध्ये Jio Mart चा 20 टक्के कॅशबॅक दिला जात आहे.

Advertisement

जिओच्या 299 रुपयांच्या रिचार्जमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा दिला जात आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100SMS आणि अनलिमिटेड कॉल सुविधा दिली जात आहे. या प्लानमध्ये सुद्धा Jio Mart चा 20 टक्के कॅशबॅक दिला जात आहे.

Advertisement

काम की बात : किती ‘GB’ चा स्मार्टफोन असतो सर्वात बेस्ट..? ; जाणून घ्या, माहिती, नॉलेज होईल अपडेट..

Advertisement
Advertisement

Leave a Reply