Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. शेजारी पेट्रोल 144 रुपये लिटर; लोकांना नव्या वर्षाचे मिळालेय जबरदस्त गिफ्ट; पहा, नेमके काय घडलेय ?

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये कोरोना काळात महागाईने हाहाकार उडाला आहे. महागाई कमी करण्याऐवजी येथील सरकार मात्र त्यात आणखी वाढ करत आहे. आताही सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील नागरिकांना जोरदार झटका दिला आहे. देशात पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारने हा नवा आदेश नुकताच जारी केला आहे.

Advertisement

या निर्णयानुसार, सरकारने देशातील पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 4 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत 140.82 वरून 144.82 पाकिस्तानी रुपये प्रति लीटर झाली आहे. रॉकेलच्या किमतीतही 3.95 रुपयांनी वाढ केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू करण्यात आली आहे. सरकारच्या या कारभारावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. सरकारने नवीन वर्षात देशातील लोकांना दिलेले हे गिफ्ट आहे, असे येथील विरोधी पक्षांनी म्हटले आहे.

Advertisement

पाकिस्तानमध्ये आता मोबाइल, कॉम्प्युटरसह अनेक वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. यासाठी सरकारने मिनी बजेट तयार केले आहे. या विधेयकासही विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला आहे. मात्र, सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. तसे पाहिले तर देशाची अर्थव्यवस्था सध्या अतिशय खराब स्थितीत आहे.

Loading...
Advertisement

या संकटातून बाहेर पडायचे असेल तर देशांतर्गत करात वाढ करावी, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार, हे विधेयक तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. हे विधेयक नुकतेच सभागृहात सादर केले होते त्यानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. पाकिस्तानच्या विरोधी पक्षांनी या मिनी बजेटला विरोध केला आहे.

Advertisement

त्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण तयार होत आहे. देश आधीच कर्जात आहे. आधीच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी नवे कर्ज घ्यावे लागत आहे. त्यात आता महसूलही घटला आहे. त्यामुळे देश चालवण्यासाठीही पैसे राहत नसल्याचे येथील राज्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत आता नागरिकांना त्रास देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे.

Advertisement

अर्र..घ्या आता.. सरकारमुळेच वाढणार महागाई; म्हणून पाकिस्तान सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply