Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काम की बात : किती ‘GB’ चा स्मार्टफोन असतो सर्वात बेस्ट..? ; जाणून घ्या, माहिती, नॉलेज होईल अपडेट..

मुंबई : सध्या स्मार्टफोन कंपन्या नवीन स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. या कंपन्यांमध्येही तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे कंपन्या फोनमध्ये आधिकाधिक फिचर देण्याचा प्रयत्न करतात. स्मार्टफोनमधील स्टोरेज, रॅम या गोष्टी जास्त महत्वाच्या ठरतात. कारण, या स्मार्टफोन कंपन्यांनी तसे वातावरण तयार केले आहे. त्यामुळे ग्राहक सुद्धा नेहमी जास्त रॅम असलेला फोन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. पण, तसे आजिबात नाही. चांगल्या स्मार्टफोनसाठी अधिक रॅम बरोबरच अन्य काही गोष्टींचीही काळजी घेतली पाहिजे. रॅम हा कोणत्याही स्मार्टफोनचा महत्वाचा घटक आहे. पण, रॅम सर्वकाही आहे, असे नाही. चला तर मग याबाबत आणखी माहिती घेऊ या..

Advertisement

कोणत्याही स्मार्टफोनमध्ये दोन प्रकारचे स्टोरेज दिले जाते, एक ‘रॅम’ आणि दुसरा ‘रॉम’. जिथे तुम्ही फोटो, व्हिडीओ यातील सर्व मोबाइल अॅप ROM मध्ये साठवले जातात. हेच स्टोरेज अॅप, फोटो, व्हिडिओ रॅमवर ​​चालतात. फोनवर काहीही चालवण्यासाठी रॅम आवश्यक आहे. फोनवरील कोणतेही अॅप सुरळीत चालावे असे वाटत असेल तर फोनमध्ये अधिक रॅम असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एकाच वेळी जास्त कामे स्मार्टफोनद्वारे करत असाल तर जास्त रॅम लागेल. जर रॅम कमी असेल तर या कामकाजाचा वेग मंद होऊ शकतो किंवा फोन हँग होण्याची समस्या येऊ शकते.

Advertisement

स्मार्टफोनमध्ये किती जीबी रॅम असावी याचे नेमके उत्तर देता येत नाही. कारण, प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात. सरासरी पाहिले तर स्मार्टफोन वापरकर्त्यासाठी 6GB RAM भरपूर आहे. तसेच, जर तुम्ही स्मार्टफोनमध्ये फक्त काही निवडक मोबाइल अॅप मर्यादित रेंजमध्ये वापरत असाल, तर तुमच्यासाठी 4GB रॅम देखील भरपूर आहे.

Loading...
Advertisement

स्मार्टफोनचा वेग अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. अशा स्थितीत स्मार्टफोनमध्ये जास्त जीबी रॅम असल्याने स्मार्टफोन वेगवान होणार नाही. यासाठी, फोनमध्ये अत्यंत दर्जेदार प्रोसेसर, चांगला रिफ्रेश दरासह नवीनतम ऑपरेट सिस्टम आणि दर्जेदार डिस्प्ले असावा.

Advertisement

नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; होईल तुमचा फायदा, जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply