Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस दर कपात; पण, नागरिकांना फायदा नाहीच; जाणून घ्या, नेमके कारण..

मुंबई : देशात महागाई रोजच नवनवे रेकॉर्ड प्रस्थापित करत आहे. मात्र, आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी व्यापाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या दरात कपात केली आहे. 19 किलोच्या कमर्शिअल गॅस टाकीचे दर कमी करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. IOCL नुसार, आज राजधानी दिल्लीत कमर्शिअल गॅस टाकीची किंमत 102 रुपयांनी कमी होऊन 1998.50 रुपये झाली आहे.

Advertisement

याआधी 31 डिसेंबर गॅस टाकीचे दर 2101 रुपये होते. या नव्या दर कपातीमुळे भाव शंभर रुपयांनी कमी झाले आहेत. तर चेन्नईमध्ये 19 किलोच्या कमर्शिअल गॅस टाकीचे दर 2131 रुपये आणि मुंबई शहरात 1948.50 रुपये तर कोलकाता शहरात 2076 रुपये झाले आहेत. कंपन्यांनी घरगुती गॅस टाकीच्या दरात मात्र कोणतेही बदल केलेले नाहीत. महागाईने नागरिक आधीच हैराण झाले आहेत. त्यात इंधनाची दरवाढ त्रासदायक ठरत आहे. अशा परिस्थितीत घरगुती गॅसचे दर नव्या वर्षात काही प्रमाणात कमी होतील, असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र, तेल कंपन्यांनी नागरिकांकडे दुर्लक्ष केले आहे.

Loading...
Advertisement

सध्या दिल्ली आणि मुंबईत विना अनुदानित 14.2 किलोच्या घरगुती गॅस टाकीचे दर 899.50 रुपये आहेत. कोलकातामध्ये 926, चेन्नईत 915.50 रुपये असे दर आहेत. या निर्णयाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. नागरिकांना नव्या वर्षात सुद्धा गॅस टाकीसाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. आधीच अनुदान मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यात पुन्हा सातत्याने भाव वाढत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

Advertisement

गॅस सिलिंडरच्या दरात वाढ..! किंमत कमी होण्याच्या अपेक्षा ठरल्या फोल..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply