बाब्बो.. ‘त्या’ दिग्गज कार कंपनीलाही बसलाय जोरदार झटका.. तब्बल साडेचार लाख कार मागवल्या परत; पहा, काय आहे कारण ?
नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी मानल्या जाणाऱ्या टेस्लाला मोठा झटका बसला आहे. कंपनीला अमेरिकेमधील ‘Model 3’ आणि ‘Model एस’ वाहने परत मागवण्याची नामुष्कीची वेळ आली आहे. या वाहनांची संख्या 4,75,330 इतकी आहे. यामध्ये 3,56,309 मॉडेल 3 वाहने आणि 1,19,009 मॉडेल S वाहनांचा समावेश आहे. खरे तर, मॉडेल 3 च्या जुलै 2017 आणि सप्टेंबर 2020 दरम्यान उत्पादित केलेल्या युनिट्सच्या कॅमेऱ्यांमध्ये समस्या आहेत. त्याचप्रमाणे, सप्टेंबर 2014 ते डिसेंबर 2020 दरम्यान उत्पादित मॉडेल S च्या कारमध्येही काही समस्या उद्भवल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला मॉडेल 3 मध्ये ट्रंकमध्ये एक केबल आहे जी कॅमेऱ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. मात्र, कालांतराने केबल खराब होऊ शकते. त्यामुळे कॅमेऱ्यावर परिणाम होण्याचीही शक्यता आहे. केबल खराब झाल्यास कारमध्ये नवीन ट्रंक हार्नेस आणि मार्गदर्शक स्थापित केले जाईल. टेस्ला 18 फेब्रुवारी 2022 रोजी या मॉडेल 3 वाहनांच्या मालकांशी संपर्क साधणार आहे.
टेस्ला मॉडेल एस कारच्या समोरच्या स्टोरेजमध्ये काही समस्या आहेत. त्यामुळे ही वाहने सुद्धा परत मागवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. टेस्ला मॉडेल 3 हे 568 किलोमीटर पर्यंत आणि टेस्ला मॉडेल एस 652 किमी पर्यंतच्या रेंजसह येते. टेस्ला वाहनांमध्ये दोष आढळण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, मॉडेल 3 आणि मॉडेल S वाहनांमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे ही वाहने सुद्धा कंपनीने परत मागवली होती.
आताही कंपनीच्या काही कारमध्ये काही समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे साडेचार लाखांपेक्षा जास्त कार कंपनीने परत मागवल्या आहेत. विशेष म्हणजे, या कार लोकांनी खरेदी केलेल्या आहेत. त्यामुळे आता या प्रत्येक वाहनधारकाशी संपर्क करुन या कार परत घेतल्या जाणार आहेत.
बाब्बो.. 30 किलो डायनामाइटने उडवली स्वतःची 75 लाखांची टेस्ला कार… काय होते कारण