Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. म्हणून ‘तिथे’ तब्बल एक हजार विमान उड्डाणे केली रद्द; जाणून घ्या, नेमके काय घडलेय ?

नवी दिल्ली : संपूर्ण जगात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत जगभरातील अनेक देश संकटात सापडले आहेत. अनेक देशांनी कठोर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेत तर कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज लाखो नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सरकारने काही कठोर निर्णय घेतले आहेत.

Advertisement

यूएस एअरलाइन्सने 1000 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. मात्र, याआधीही कोरोना प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. कॅथे पॅसिफिक एअरवेज लिमिटेडने पुढील महिन्यात चीनच्या बाहेरून हाँगकाँगला जाणाऱ्या फ्लाइटची संख्या जवळपास निम्मी केली. ब्रिटिश एअरवेजने मार्चपर्यंत प्रदेशातील उड्डाणे रद्द करण्याची योजना आखली आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, व्हायरसचे सर्वात मोठे संकट सध्या युरोपमध्ये पाहायला मिळत आहे. एएफपीच्या म्हणण्यानुसार, कोरोनाने युरोपमध्ये पुन्हा एकदा हाहाकार उडाला आहे. त्यामुळे सरकारांना पुन्हा निर्बंध जारी करणे भाग पाडले आहे. युरोपमध्ये गेल्या सात दिवसांत 3.5 दशलक्षाहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ब्रिटन, फ्रान्स, ग्रीस आणि पोर्तुगाल या सर्व देशांमध्ये दररोज सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.

Advertisement

युरोपीय देश फ्रान्समध्ये मागील 24 तासांत कोरोनाचे दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्री ऑलिव्हियर व्हेरन यांनी सांगितले, की हा एक नवीन दैनिक रेकॉर्ड आहे. मंगळवारी 1,79,807 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. मात्र, बुधवारी हा आकडा 2,08,000 वर पोहोचला. वाढती रुग्णसंख्या पाहता फ्रान्स सरकारने देशभरात काही निर्बंध नव्याने जारी केले आहेत. अमेरिकेतही अशीच परिस्थिती दिसून येत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply