Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नव्या तंत्रज्ञानात रिलायन्स कंपनीची एन्ट्री; ‘या’ दिग्गज ब्रिटीश कंपनीस विकत घेणार, जाणून घ्या, अपडेट

मुंबई : देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या रिलायन्स उद्योग समूहाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स कंपनी आता स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातही मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळाली आहे. रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड कंपनी तब्बल 10 अब्जांपेक्षा जास्त रक्कम खर्च करुन फॅराडियन लिमिटेड ही कंपनी विकत घेणार आहे. या संदर्भातील करारावर स्वाक्षरी झाली आहे. रिलायन्स कंपनीकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे.

Advertisement

याव्यतिरिक्त, आरएनईएसएल नवीन व्यवसायाच्या विस्तारासाठी भांडवल म्हणून 25 दशलक्ष ब्रिटिश पाउंडची गुंतवणूकदेखील करणार आहे. मूळची ब्रिटिश असलेली फॅराडियन कंपनी कित्येक दिवसांपासून देशात उत्पादनाच्या संधी शोधत होती. फॅराडियन लिमिटेड ही सोडियम-आयन बॅटरी निर्मिती करणाऱ्या जगातील आघाडीच्या उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. सोडियम-आयन बॅटरीचं तंत्रज्ञान लिथियम-आयन बॅटरीपेक्षा चांगले आहे. या बॅटरीज जगभरातील ऑटोमोबाइल, स्टोरेज आणि मोबाइल क्षेत्रात क्रांती घडवू शकतात, असे कंपनीचे म्हणणे आहे.

Advertisement

देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. इंधनाचे वाढलेले भाव यास कारणीभूत ठरत आहेत. तसेच सरकारने सुद्धा या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. परिणामी, लोकांनी आता इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे बदलत्या बाजारपेठेत नवीन तंत्रज्ञानाच्या बॅटरी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. फॅराडियनचे सोडियम-आयन तंत्रज्ञान हे लिथियम-आयन आणि लीड-अ‍ॅसिड बॅटरीला सर्वात चांगला पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो. त्यामुळे सोडियम-आयन बॅटरी सध्याच्या घडीला अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Loading...
Advertisement

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी फॅराडियन लिमिटेडच्या अधिग्रहणाबाबत माहिती दिली आहे. आम्ही फॅराडियन आणि त्यांच्या अनुभवी टीमचे रिलायन्स परिवारात स्वागत करतो, अशा शब्दांत त्यांनी फॅराडियनचे स्वागत केले. फॅराडियनने विकसित केलेल्या सोडियम-आयन तंत्रज्ञानात सोडियमचा वापर केला जातो. त्यामुळे हे तंत्रज्ञान जगातील सर्वाधिक ऊर्जा साठवण क्षमता देते. यामुळे देशाची एनर्जी स्टोरेज क्षमता आणखी मजबूत आणि सुरक्षित होईल, असे अंबानी म्हणाले.

Advertisement

कोण असेल रिलायन्सचा उत्तराधिकारी… काय म्हणाले मुकेश अंबानी

Advertisement
Advertisement

Leave a Reply