Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारीच.. नवीन वर्षासाठी JIO आणि BSNL चे शानदार गिफ्ट; ‘या’ रिचार्ज प्लानमध्ये मिळणार मोठा फायदा; जाणून घ्या..

मुंबई : शनिवारपासून नवीन वर्ष सुरू होणार आहे. या नव्या वर्षात टेलिकॉम कंपन्यांनी काही खास ऑफर आणल्या आहेत. या प्लानच्या माध्यमातून कंपन्या लोकांना नवीन वर्षाचे गिफ्ट देणार आहेत. सध्या दूरसंचार कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सध्या तरी रिलायन्स जिओ आघाडीवर दिसत आहे. या कंपनीने अन्य कंपन्यांच्या तुलनेत कमी वेळात जास्त ग्राहक जोडले आहेत. कंपनीने प्लानही वेगळे असतात, त्यामुळे मार्केटमध्ये आणखी मजबूत होण्यास कंपनीस मदत मिळत आहे. आताही कंपनीने नवीन वर्षानिमित्त अशीच एक भन्नाट ऑफर आणली आहे. विशेष म्हणजे, यावेळी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल जिओला टक्कर देताना दिसत आहे. कारण, बीसएसएनएलने सुद्धा अशीच एक ऑफर आणली आहे.

Advertisement

या दोन्ही कंपन्या त्यांच्या वार्षिक प्लॅनसह रिचार्ज करणाऱ्या युजर्सना 60 दिवसांपर्यंत अधिक वैधता देत आहेत. कंपन्यांच्या या वार्षिक प्लॅनमध्ये, दररोज 3 GB डेटा आणि अमर्यादित कॉल सारखे मोठे फायदे आहेत. चला तर मग आधिक माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

BSNL आपल्या 2399 रुपयांच्या प्लानवर नवीन वर्षासाठी खास ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत युजर्सना 365 दिवसांऐवजी 425 दिवसांची वैधता मिळेल. वापरकर्त्यांना 60 दिवसांच्या अतिरिक्त वैधतेसाठी या प्लानचे सदस्यत्व घेण्याची शेवटची संधी आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल विचार केला तर यामध्ये कंपनी इंटरनेटसाठी दररोज 3 जीबी डेटा देत आहे.

Advertisement

प्लॅनमध्ये उपलब्ध असलेला हा डेटा कॅपिंगसह येतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, प्लॅनमध्ये उपलब्ध इंटरनेटचा वेग 80Kbps पर्यंत कमी होतो. दररोज 100 मोफत एसएमएस देणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉल मिळतात. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Eros Now चे मोफत सबस्क्रिप्शनही मिळते.

Loading...
Advertisement

Jio आपल्या नवीन ऑफर अंतर्गत 2545 रुपयांच्या वार्षिक प्लॅनवर 29 दिवसांची अतिरिक्त वैधता देत आहे. कंपनीची ऑफर 2 जानेवारीपर्यंत असेल. या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी कंपनी दररोज 1.5 GB डेटा देते. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज अमर्यादित कॉल आणि 100 मोफत एसएमएसही मिळतात.

Advertisement

BSNL चे जबरदस्त प्लान..! जिओ, एअरटेल कुणीच देणार नाही टक्कर; जाणून घ्या, काय आहेत फायदे ?

Advertisement

जिओच्या धमाकेदार New Year प्लानसाठी राहिलेत फक्त 5 दिवस; पहा, वर्षभरात काय मिळणार फायदे

Advertisement
Advertisement

Leave a Reply