Take a fresh look at your lifestyle.

नोकरदारांसाठी खुशखबर..! ईपीएफओने घेतलाय महत्वाचा निर्णय; जाणून घ्या, तुमच्यासाठी आहे महत्वाचे..

नवी दिल्ली : देशातील नोकरदार मंडळींसाठी एक खुशखबर मिळाली आहे. नवीन वर्ष सुरू होण्याआधी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने एक ट्विट केले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे, की सभासद 31 डिसेंबर नंतर सुद्धा ई-नॉमिनेशन सुविधेद्वारे नॉमिनीचे नाव जोडू शकतात. ई-नॉमिनेशनद्वारे नॉमिनी जोडण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 पर्यंत होती. आता मात्र यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

Advertisement

याआधी 31 डिसेंबरपर्यंत मुदत असल्याने अनेकांनी वारसदाराचे नाव जोडणे सुरू केले होते. मात्र, ईपीएफओ पोर्टल डाऊन झाले होते. त्यामुळे अनेकांना नॉमिनी नाव अपडेट करता आले नाही, अशी माहिती मिळाली होती. पीएफ खातेधारक ऑनलाइन पद्धतीने सुद्धा नॉमिनीचे नाव जोडू शकतात. तसेच खातेधारक एकापेक्षा जास्त नॉमिनीचे नाव देखील जोडू शकतात. इतकेच नाही तर खातेधारक नॉमिनीला मिळणारी हिस्सेदारी सुद्धा निश्चित करू शकतो.

Advertisement

पीएफ खातेदारांमध्ये नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ई-नामांकन मोहिमेअंतर्गत बिहारमधील सर्व पाच लाख पीएफ सदस्यांच्या खात्यात वारसदारांची नावे अनिवार्यपणे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे, पीएफ सदस्यांच्या अनुपस्थितीत, त्यांच्या कुटुंबांना विमा किंवा पेन्शनची रक्कम मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

Advertisement

दरम्यान, नवीन वर्ष सुरू होण्यास आता फक्त एकच दिवस बाकी राहिला आहे. त्यामुळे लोकांनी आपली राहिलेली महत्वाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. बँके संबंधित कामकाजाचाही विचार केला आहे. आरबीआयने याबाबतीत मात्र बँक ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँकेने महत्वाचा निर्णय घेत KYC अपडेट करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळे आता केवायसी अपडेट करण्यासाठी 31 मार्च 2022 पर्यंत मुदत मिळाली आहे.

Advertisement

कोरोनाच्या संकटात बँक ग्राहकांना दिलासा..! आरबीआयने ‘त्यासाठी’ दिलीय तीन महिने मुदतवाढ; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply