Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘एटीएम’ च्या नव्या निर्णयाचा होणार ‘असा’ इफेक्ट..! ‘त्या’ पद्धतीच्या व्यवहारांत होणार वाढ; पहा, कुणी व्यक्त केलाय ‘हा’ अंदाज ?

मुंबई : देशात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोना काळात या पद्धतीच्या व्यवहारात मोठी वाढ झाली. मात्र, लॉकडाऊन काळात डेबिट आणि क्रेडिट कार्ड पेमेंटमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. कोरोना लॉकडाऊन काळात कार्ड पेमेंटमध्ये जवळपास 10.8 टक्के घसरण झाली. आता मात्र, यामध्ये वेगाने सुधारणा होत आहे. सन 2022 मध्ये देशातील कार्ड पेमेंट 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढून 22 लाख कोटी रुपयांवर जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement

एसबीआय कार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. रामा मोहन राव आमरा यांनी सांगितले, की आमचे क्रेडिट कार्ड पेमेंट सप्टेंबर तिमाहीत 47 टक्क्यांनी वाढून 43 हजार कोटी रुपये झाले, जे कोणत्याही तिमाहीत सर्वाधिक आहे. 2022 मध्ये देखील कार्ड पेमेंटमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. 1 जानेवारीपासून एटीएममधून निर्धारित संख्येनंतर पैसे काढल्यास पूर्वीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे कार्डचा वापर वाढेल. भारतात रोख आणि कार्ड पेमेंटचे प्रमाण सध्या 14:1 आहे, त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात सुद्धा याचा परिणाम दिसून येईल.

Advertisement

दरम्यान, कोरोना काळात ऑनलाइन व्यवहारांत मोठी वाढ झाली आहे. पैसे देवाण घेवाण या पद्धतीने होत आहे. रोखीचे व्यवहार काही प्रमाणात कमी झाले आहेत. तसेच कार्डद्वारे  पेमेंटचे प्रमाणही थोडे कमी झाले आहे. आता मात्र कार्ड पेमेंटमध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण,  एटीएमद्वारे पैसे काढण्यासाठी मोफत मर्यादेनंतर नेहमीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. 1 जानेवारीपासून हा नवा नियम लागू होणार आहे.

Loading...
Advertisement

त्यामुळेे लोक आता वारंवार पैसे काढण्याचे प्रमाण कमी करतील. त्यामुळे आपोआप कार्डद्वारे पेमेंट करण्याचे प्रमाण वाढेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Advertisement

नवीन वर्षात बजेट बिघडणार..! डिजिटल पेमेंटमध्ये होणार मोठा बदल, ‘एलपीजी’ बाबतही होणार निर्णय

Advertisement
Advertisement

Leave a Reply