Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. अर्थव्यवस्थेसमोर पुन्हा आलेय ‘ते’ मोठे संकट; आरबीआयने सांगितलेत ‘हे’ महत्वाचे उपाय; जाणून घ्या..

मुंबई: कोरोना काळात देशाची अर्थव्यवस्था आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपासून अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. मात्र, सातत्याने वाढत जाणारी महागाई आणि कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने अर्थव्यवस्थेसमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे. आज बुधवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या आर्थिक स्थिरता अहवालात आरबीआयने ही माहिती दिली आहे.

Advertisement

अहवालाच्या प्रस्तावनेत बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे, की या वर्षात एप्रिल-मे मध्ये कोरोना व्हायरस साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेनंतर अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दृष्टीकोन हळूहळू सुधारला आहे. परंतु, जागतिक घडामोडी आणि ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन स्वरूपामुळे अर्थव्यवस्थेसमोर आव्हान उभे राहिले आहे.

Advertisement

वाढत्या खर्चामुळे निर्माण होणाऱ्या महागाईबद्दल अद्याप काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. अन्न आणि ऊर्जेच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी पुरवठा आघाडीवर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. धोरण आणि नियामक समर्थनामुळे कोरोना संकटाच्या काळात वित्तीय संस्था मजबूत राहिल्या आहेत आणि वित्तीय बाजार स्थिर राहिले आहेत. बँकांचे मजबूत खातेवही तसेच भांडवल आणि तरलतेच्या चांगल्या स्थितीमुळे त्यांना भविष्यातील संकटांचा सामना करण्यास मदत होईल, असे दास यांनी सांगितले. सप्टेंबर 2021 मध्ये एनपीए 6.9 टक्क्यांवरून सप्टेंबर 2022 मध्ये 8.1-9.5 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Loading...
Advertisement

जगात गेल्या एका आठवड्यात कोरोना संसर्गाची प्रकरणे 11 टक्क्यांनी वाढली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे, की Omicron प्रकारांमुळे निर्माण झालेला धोका अजूनही ‘खूप जास्त’ आहे. Omicron मुळे जगातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. ज्या देशांमध्ये ओमिक्रॉनने डेल्टा प्रकाराला मागे टाकले आहे तेथे प्रकरणे सतत वाढत आहेत.

Advertisement

WHO ने आपल्या साप्ताहिक अपडेटमध्ये म्हटले आहे की, ‘ओमिक्रॉनच्या नवीन प्रकाराचा धोका अजूनही खूप जास्त आहे. ओमिक्रॉन प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा वेगाने पसरत आहे आणि केवळ दोन ते तीन दिवसांत दुप्पट होत आहे. या वेगामुळे जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. या देशांमध्ये ब्रिटन आणि अमेरिकेचाही समावेश आहे, जिथे ओमिक्रॉनने डेल्टाला मागे टाकले आहे.

Advertisement

WHO ने ओमिक्रॉनबाबत केलाय मोठा खुलासा.. म्हणून या व्हेरिएंटचा धोका जास्त; पहा, किती टक्के वाढलेत रुग्ण

Advertisement
Advertisement

Leave a Reply