Take a fresh look at your lifestyle.

आता चार्जिंगचे टेन्शन विसरा..! ‘ही’ कंपनी उभारणार चार्जिंग नेटवर्क; पहा, देशात किती चार्जिंग स्टेशन सुरू होणार ?

मुंबई : देशात इलेक्ट्रिक वाहनांना अद्याप अपेक्षित प्रमाणात मागणी नाही. चार्जिंग स्टेशनची कमतरती हे महत्वाचे कारण यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. त्यानंतर आता खासगी कंपन्याही मदत करण्यास पुढे येत आहेत. देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओला इलेक्ट्रिक देशभरात ‘हायपरचार्जर्स’ नावाने चार्जिंग नेटवर्क उभारणार आहे. या ‘हायपरचार्जर’च्या मदतीने ओला ई-स्कूटर 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकते. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

Advertisement

त्यांनी सांगितले, की कंपनी आगामी काळात चार्जिंग पायाभूत सुविधांचा विस्तार करणार आहे. ओलाने यावर्षी आपली इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस1 आणि ओला एस1 प्रो लाँच केली. कंपनीने अलीकडेच देशातील काही शहरांमध्ये त्यांचे वितरण सुरू केले आहे. सोशल मीडियावर याची घोषणा करताना अग्रवाल म्हणाले की, ओला इलेक्ट्रिकचे भारतात 4 हजारांपेक्षा जास्त अधिक चार्जिंग पॉइंट्स स्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. हायपरचार्जर प्रथम BPCL पेट्रोल पंपासारख्या सार्वजनिक ठिकाणी बसवले जात आहेत. त्यासोबतच निवासी संकुलात बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

सर्व शहरांमध्ये हायपरचार्जर रोल आउट सुरू झाले आहे. दीड महिन्यात देशभरात 4 हजारांपेक्षा जास्त हायपरचार्जर बसवले जातील. कंपनीचे सर्व ग्राहक जूनपर्यंत ही सुविधा मोफत असेल. ऑक्टोबरमध्ये, ओला इलेक्ट्रिकने पहिले हायपरचार्जर लाँच करण्याची घोषणा केली. कंपनीने सांगितले होते, की हायपरचार्जर सेटअप अंतर्गत ग्राहकांसाठी चार्जिंग सपोर्ट स्थापित करेल, जे देशातील 400 शहरांमधील एक लाखांपेक्षा जास्त ठिकाणी सुरू केले जातील.

Advertisement

ओला इलेक्ट्रिकचे हायपरचार्जर केवळ 18 मिनिटांत ई-स्कूटरची बॅटरी 50 टक्क्यांपर्यंत पर्यंत चार्ज करण्यास सक्षम असेल. यासह, स्कूटर एका चार्जवर 75 किमीपर्यंत अंतर पार करू शकेल. ओला प्रत्येक स्कूटरसोबत होम-चार्जर देखील देत आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांची स्कूटर घरबसल्याही चार्ज करता येईल. कंपनीने आपल्या वेबसाइटवर शहरनिहाय चार्जिंग नेटवर्क नमूद केले आहे आणि अनेक ठिकाणी लोकेशनही सांगितले आहे.

Advertisement

आता इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगचे टेन्शन विसरा; ‘ही’ कंपनी सुरू करणार इतके चार्जिंग स्टेशन

Advertisement
Advertisement

Leave a Reply