Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. आता रेल्वेनेही आणलेय मेडिकल अॅप..! सर्व आरोग्य सुविधा मिळणार ऑनलाइन; पहा, कुणाला मिळणार फायदा ?

नवी दिल्ली : आजच्या डिजिटल युगात रेल्वे रुग्णालये सुद्धा हायटेक होत आहेत. रेल्वेने आपली सर्व रुग्णालये हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (HMIS) ने सुसज्ज केली आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांना आता अॅपद्वारेच रुग्णालयांशी संबंधित सुविधा मिळू शकणार आहेत. रुग्णवाहिकेचे बुकिंग असो की ओपीडी बुकिंग. ही सर्व महत्वाची कामे आता अगदी कमी वेळात होणार आहेत. इतकेच नाही तर रुग्णालयात उपलब्ध नसलेली औषधे घरबसल्या ऑनलाइन मागवता येतील.

Advertisement

RailTel ने HMIS बरोबर रेल्वेची सर्व 695 रुग्णालये आणि आरोग्य युनिट्स जोडण्याचे काम पूर्ण केले आहे. ही वेब-आधारित मल्टी-मॉड्यूल सुविधा आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांमधील अंतर कमी झाले आहे. या अंतर्गत, एक अॅप विकसित करण्यात आले आहे, जे प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते आणि ओपीडी नोंदणी देखील केली जाऊ शकते. नवीन वर्षाची भेट म्हणून यामध्ये अॅम्ब्युलन्स बुक करण्याची सुविधाही असेल.

Advertisement

रुग्णांना त्यांचे सर्व वैद्यकीय रेकॉर्ड त्यांच्या मोबाईलवर पाहता येणार आहेत. प्रयोगशाळा चाचणी निकालांची मॅन्युअल डेटा एन्ट्री करण्याची आवश्यकता आता राहणार नाही. हे प्लॅटफॉर्म कर्मचाऱ्यांच्या युनिक मेडिकल आयडेंटीटी बरोबर जोडलेले आहे. यासाठी भारतीय रेल्वेने नियमित कर्मचारी, पेन्शनधारक आणि कुटुंबातील सदस्यांना सुमारे 42 लाख युनिक मेडिकल ओळखपत्र जारी केले आहेत.

Loading...
Advertisement

या तंत्रज्ञानामुळे सर्व वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय प्रक्रिया आणि विविध आयटी प्रणाली एकत्रित येणार आहेत. सर्व रुग्णांचे इलेक्ट्रॉनिक वैद्यकीय रेकॉर्ड तयार केले जाईल. रुग्णालयात उपलब्ध नसलेली औषधे स्थानिक खरेदीद्वारे ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकतात. इन-पेशंट विभाग मॉड्यूल अंतर्गत रूग्णांना केवळ दाखल करून डिस्चार्ज जाऊ शकत नाही, तर औषधे, उपचार यांबाबत संपूर्ण क्लिनिकल प्रक्रिया देखील ऑनलाइन पद्धतीने होतील, असे रेलटेलचे सीएमडी पुनित चावला यांनी सांगितले.

Advertisement

कोरोनामुळे एकाच वर्षात रेल्वेचे कोट्यावधींचे नुकसान; सरकारने दिलीय माहिती; तुम्हीही जाणून घ्या

Advertisement
Advertisement

Leave a Reply