Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

स्मार्टफोन खराब होण्याचे टेन्शन होईल दूर; फक्त ‘या’ सोप्या उपायांकडे लक्ष द्या; जाणून घ्या, महत्वाची माहिती

अहमदनगर : कोरोना संकटाच्या काळात स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. कारण, आज अनेक महत्वाची कामे स्मार्टफोनच्या मदतीने अगदी काही वेळातच होत आहेत. कोरोना काळात तर वर्क फ्रॉम सुरू आहे, तसेच ऑनलाइन कामकाजास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सहाजिकच स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. अशा परिस्थितीत, आपली गरज आणि भविष्यातील मागणी लक्षात घेऊन, फोन खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. फोन खरेदी करताना जितकी काळजी आपण घेतो, त्यानंतर फोन खरेदी केल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. फोन सुरक्षित ठेवणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेऊ या, फोन सुरक्षित ठेवण्याचे काही उपाय.

Advertisement

स्मार्टफोनला स्क्रीन प्रोटेक्टर बसवणे आवश्यक आहे. कोणत्याही स्मार्टफोनमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्क्रिनआहे कारण, त्याशिवाय फोन नियंत्रित केले जाऊ शकत नाही. कोणतेही कामकाज करणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत, स्क्रीनच्या सुरक्षिततेकडे पहिले लक्ष दिले पाहिजे, त्यामुळे फोनच्या स्क्रीनवर स्क्रीन प्रोटेक्टर बसवणे फायद्याचे ठरेल. त्यामुळे एखाद्या वेळी फोन खाली पडला तरी स्क्रीन फुटण्याची शक्यता कमी होईल.

Advertisement

स्मार्टफोन आता अतिशय आकर्षक रंगात येतात आणि मागील पॅनलवर काचेसह येतात. अशा वेळी लोक फोन कव्हर लावत नाहीत, तर फोन सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावर कव्हर लावले पाहिजे.

Loading...
Advertisement

मोबाइल सुरक्षित राहण्यासाठी वेगळ्या खिशात ठेवा. अनेक वेळा आपण सुटे पैसे आणि अन्य वस्तू एकाच खिशात ठेवतो. यामुळे तुमचा फोन खराब होण्याची शक्यता असते. स्क्रीनही खराब होण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी फोन शक्यतो वेगळ्या खिशात ठेवणे गरजेचे आहे.

Advertisement

स्मार्टफोन खरेदी करण्याचा आहे ‘प्लान’..? मग, ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच; फायदाच होईल

Advertisement
Advertisement

Leave a Reply