जिओच्या धमाकेदार New Year प्लानसाठी राहिलेत फक्त 5 दिवस; पहा, वर्षभरात काय मिळणार फायदे
मुंबई : नवीन वर्षानिमित्त रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक खास प्लान लाँच केला आहे. या ऑफर अंतर्गत रिलायन्स जिओ आपल्या 336 दिवसांच्या प्लॅनसह 29 दिवसांची अतिरिक्त वैधता देत आहे. Jio चा 2 हजार 545 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान आता पूर्ण 365 दिवस चालेल. जिओचे विद्यमान आणि नवीन दोन्ही प्रकारचे युजर्स या योजनेस पात्र आहेत.
Reliance Jio युजर्स 2 जानेवारी 2022 पर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच, जर वापरकर्त्यांना या प्लॅनचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना 2 जानेवारीपूर्वी या प्लानसह रिचार्ज करावे लागेल. अतिरिक्त वैधता व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये कोणताही बदल नाही.
रिलायन्स जिओच्या सर्व-नवीन हॅपी न्यू इयर ऑफरमध्ये अमर्यादित स्थानिक आणि राष्ट्रीय कॉलचा समावेश आहे. यामध्ये दररोज 100 SMS आणि 1.5GB डेटा मिळतो. मर्यादित कालावधीच्या ऑफर अंतर्गत प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता दिली जात आहे. हा प्लान Reliance Jio च्या वेबसाइट आणि MyJio मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त रिलायन्स जिओ युजर्सना या प्लानसह JioSuite अॅपमध्ये मोफत सबस्क्रिप्शन मिळते ज्यामध्ये JioCinema, JioTV, JioCloud आणि बरेच काही समाविष्ट आहे.
2020 मध्ये देखील, रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी आणि JioPhone ग्राहकांसाठी ‘2020 Happy New Year’ ऑफर लाँच केली होती. या प्लानमध्ये, अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज 100 एसएमएस आणि Jio अॅप मोफत सबस्क्रिप्शन दररोज 1.5GB डेटासह उपलब्ध आहे. त्यावेळी हा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह आला होता.
दरम्यान, याआधी कंपनीने फक्त 1 रुपयाचा प्रीपेड प्लान लाँच केला होता. या प्लानमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 100 एमबी इंटरनेट डेटा देण्यात येत होता. मात्र काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीने या प्लानमध्ये मोठी कपात केली. त्यानंतर या प्लानमध्ये फक्त एक दिवसाच्या वैधतेसह 10 एमबी डेटा दिला जात होता. आता मात्र कंपनीने कुणाला काही समजण्याच्या आत हा प्लान कायमचा बंद करून टाकला आहे.
अर्र.. ‘जिओ’ ने अखेर ‘तो’ 1 रुपयाचा प्लान केला बंद; जाणून घ्या, कंपनीने का घेतलाय ‘हा’ निर्णय