Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनी मालाचा बहिष्कार ठरला फेल..! ‘या’ वर्षात भारत-चीन व्यापाराने केलेय मोठे रेकॉर्ड; पहा, कुणी केलाय खुलासा

नवी दिल्ली : भारत आणि चीन या देशात काही वर्षांपासून वाद वाढत चालला आहे. भारताला त्रास देण्याची एकही संधी चीन सोडत नाही. आता तर पाकिस्तानच्या मदतीने आणखी नवे कारनामे या देशाने सुरू केले आहेत. असे असले तरी या वादाचा परिणाम दोन्ही देशांच्या व्यापारावर आजिबात झालेला नाही. दोन्ही देशांनी याबाबतीत काळजी घेतल्याचे दिसत आहे. देशातील नागरिकांमध्ये चीन विरोधीत कितीही राग असला आणि त्यांनी चिनी वस्तूंचा कितीही बहिष्कार केला तरी त्याने फार फरक पडलेला नाही. या वर्षात तर दोन्ही देशांतील व्यापाराने तब्बल 100 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे.

Advertisement

या वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराने 100 अब्जचा टप्पा पार केला आहे. चीनच्या सीमाशुल्क सामान्य प्रशासन (GAC) च्या गेल्या महिन्यात मिळालेल्या आकडेवारीनुसार, भारत-चीन द्विपक्षीय व्यापार जानेवारी ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत 114.263 अब्ज डॉलर्स इतका होता, जो वार्षिक तुलनेत 46.4 टक्क्यांनी वाढला आहे. चीनला भारताकडून निर्यात 26.358 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, जी वार्षिक 38.5 टक्क्यांनी वाढली आहे. यासह, चीनमधून भारताला आयात 87.905 अब्ज झाली आहे, जी 49.00 टक्क्यांनी वाढली आहे.

Advertisement

तथापि, द्विपक्षीय व्यापाराने 100 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे. त्याच वेळी, व्यापार तूट 11 महिन्यांत 61.547 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. ही वार्षिक 53.49 टक्क्यांची वाढ आहे. भारतासाठी भविष्यात हे अडचणीचे ठरू शकते.

Loading...
Advertisement

दरम्यान, दोन्ही देशात काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. त्याचा परिणाम व्यापारावर पडलेला नाही. आजही भारतात चीनी मोबाइल कंंपन्या आघाडीवर आहेत. फक्त स्मार्टफोनच नाही तर अन्य चीनी वस्तू येथे मोठ्या प्रमाणात दिसतात. दोन्ही देशात व्यापार वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

चीनने केला होता ‘तो’ही गोंधळ; पहा व्यापाराच्या नावाखाली करोनाच्या अगोदरच काय करून ठेवले होते ते

Advertisement
Advertisement

Leave a Reply