Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काम की बात : बँक खाते बंद करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; होणार नाही मोठे नुकसान

मुंबई : आजच्या जमान्यात प्रत्येकाचे बँकेत खाते आहे. नव्हे ते आता अत्यंत गरजेचे बनले आहे. डिजिटल इंडिया आणि जनधन खाते यांसारख्या योजनांमुळे तर आता जवळपास प्रत्येक व्यक्तीचे बँकेत खाते आहे. बँक खाते असण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु अनेक वेळा जास्त नफा मिळवण्याच्या नादात लोक एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाते सुरू करतात. त्यानंतर मात्र त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत लोक एकापेक्षा जास्त बँक खाती बंद करण्यास प्राधान्य देतात.

Advertisement

पण या दरम्यान ते बँक खात्यांशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे विसरतात. ज्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे जर बँकेत खाते बंद करायचेच असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत.

Advertisement

अनेक वेळा लोक खाते उघडल्यानंतर एका वर्षाच्या आत बंद करण्याचा निर्णय घेतात. अशा परिस्थितीत त्यांना खाते बंद करण्यासाठी क्लोजिंग शुल्क भरावे लागतो. त्यामुळे खाते शक्यतो एक वर्षानंतरच बंद करावे.

Loading...
Advertisement

जर तुम्हाला आपत्कालीन स्थितीत तुमचे खाते बंद करायचे असेल तर तुम्हाला खाते बंद करण्याचे शुल्क द्यावे लागत नाही. मात्र, यासाठीही एक नियम आहे. तो म्हणजे, खाते उघडल्यानंतर 14 दिवसांच्या आत खाते बंद करावे लागेल, ज्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तसेच, जर तुम्ही एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर खाते बंद केले तर तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

Advertisement

आता प्रश्न येतो की खाते बंद केल्यावर तुम्हाला किती पैसे रोखीने मिळतात, खरं तर, जर तुम्ही खाते बंद केले आणि त्यात 20 हजारांपेक्षा जास्त रुपये असतील, तर अशा परिस्थितीत तुम्हाला फक्त 20 हजार रुपये रोख मिळतात. उर्वरीत रक्कम बँक तुम्हाला रोख स्वरुपात न देता तुमच्या इतर बँक खात्यात ट्रान्सफर करते. यासाठी तुम्हाला इतर खात्याशी संबंधित सर्व माहिती त्या बँकेला द्यावी लागेल.

Advertisement

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी…! ‘आरबीआय’चे पतधोरण जाहीर, रेपो रेट जाणून घेण्यासाठी वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply