Take a fresh look at your lifestyle.

महागाईच्या मुद्द्यावर भाजप मंत्र्यांचा अजब दावा; पहा, नेमके काय म्हणालेत केंद्रीय मंत्री गोयल

चंडीगढ : देशात इंधन दरवाढ आहे, महागाई भरमसाठ वाढली आहे. या महागाईने सर्वसामान्य नागरिक अगदीच हैराण झाले आहेत. विरोधी पक्ष सुद्धा या मुद्द्यावर रोजच सरकारवर टीका करत आहेत, तरी सुद्धा केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना देशात महागाईच नाही असे वाटत आहे. त्यांच्या दृष्टीने तर हा मुद्दाच नाही असे दिसत आहे. सरकारमधील मंत्रीच महागाई मुद्दा मानत नाहीत. उलट यावर अजब दावे करत आहेत. असेच एक वक्तव्य केंद्रीय मंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी चंडीगढ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले, की देशात महागाई नियंत्रणात आहे. काँग्रेसच्या काळात आणखी महागाई होती. यूपीए 2 सरकारच्या काळातील महागाई दर भारतीय जनता पक्षाच्या सात वर्षांच्या कार्यकाळाच्या तुलनेत 10 टक्क्यांपेक्षा जास्त होता. भाजप सरकारच्या कार्यकाळात सरासरी महागाई दर केवळ 4 ते 4.5 टक्के आहे.

Advertisement

अचानक महागाई वाढल्याच्या प्रश्नावर मंत्री गोयल म्हणाले की, कोविडनंतर जगभरात महागाई वाढली आहे, कारण पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे. जवळपास सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. भारत सरकारने तेल आणि डाळींच्या किंमती कमी करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे सध्या खाद्यतेलांच्या किंमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत.

Advertisement

दरम्यान, यावेळी त्यांनी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारवरही जोरदार टीका केली. सरकारच्या तिजोरीत जो पैसा आहे. तो सर्वसामान्य नागरिकांचा आहे. दिल्ली शहरात मागील 5 वर्षांच्या काळात एकही नवीन काम सुरू झालेले नाही. केंद्र सरकार मात्र येथे काम करत आहे. राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम सुरू आहे. पण, राज्य सरकार मात्र काहीच करत नाही.

Advertisement

मोदी सरकारच्या कृपेने भारतीयांना पुन्हा आलेत जुने दिन; पहा, महागाईचा कसा पडलाय ‘इफेक्ट’

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply