अॅमेझॉन, फ्लिपकार्टला मिळणार जोरदार टक्कर; रिलायन्सने घेतलाय ‘हा’ महत्वाचा निर्णय; जाणून घ्या अपडेट
मुंबई : जगातील आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्या अॅमेझॉन, फ्लिपकार्टना आता देशात जोरदार टक्कर मिळणार आहे. या कंपन्यांनी मक्तेदारी मोडून काढण्यासाठी भारतातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने प्लान तयार केला आहे. रिलायन्स जिओने व्हॉट्सअॅप बरोबर एक करार केला आहे. या करारानुसार, तुम्ही एखादी वस्तू जर ऑनलाइन खरेदी केली तर अगदी काही तासात तुम्हाला वस्तू मिळणार आहे. एखाद्या ऑनलाइन साइटवरुन खरेदी केल्यास तुम्हाला वस्तू मिळण्यास काही दिवस लागतात. मात्र, रिलायन्स स्टोअरवरुन बुक केल्यास काही वेळात तुम्हाला वस्तू मिळतील असे कंपनीचे नियोजन आहे.
आजच्या डिजिटल युगामध्येही किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ते देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यामुळे काळाच्या ओघात या व्यापाऱ्यांनी देखील बदलले पाहिजे. त्यांनी देखील डिजिटल व्हावे असे आम्हाला वाटते, त्यामुळे या व्यापाऱ्यांना अशीच एक संधी रिलायन्स जिओकडून येणाऱ्या काळात उलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये त्यांचा देखील मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. रिलायन्स जिओने व्हॉट्सअॅप सोबत करार केला आहे, असे जिओ प्लॅटफॉर्मचे संचालक आकाश अंबानी यांनी सांगितले.
इंटरनेट क्षेत्रात जिओमुळे मोठी क्रांती घडून आली आहे. आता या नेटवर्कचा उपयोग करून देशातील छोटे-मोठे व्यापारी जोडण्याचा आमचा उद्देश आहे. डिजिटलायझेशनमुळे त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच जिओचे देशभरात मोठ-मोठे मार्केट आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील वस्तूंचा पुरवठा कमी वेळात केला जाऊ शकतो, असे अंबानी यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या ई-कॉमर्स क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्टसह अन्य काही कंपन्यांचा दबदबा आहे. यामध्ये आता रिलायन्सचीही भर पडली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांमुळे नुकसान होत असल्याचे मत देशातील व्यापारी वर्गाचे आहे. त्यानंतर आता रिलायन्सने या क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार यामध्ये व्यापाऱ्यांचा सुद्धा फायदा होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा खरेच फायदा होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वाव.. टाटा ग्रुपने केलीय दमदार कामगिरी; ‘त्यामध्ये’ अंबानींच्या रिलायन्सलाही टाकले मागे