Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. डिजिटल पेमेंटमध्ये मिळालीय आघाडी; पहा, चीन आणि अमेरिका कुठे आहेत..

नवी दिल्ली : कोरोना काळात देशात डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. कोरोनामुळे हे शक्य झाले आहे. कारण, या काळात ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत होते. देशात इंटरनेटचे वापरकर्ते मोठ्या संख्येने आहेत. सुमारे 1 अब्ज डेबिट, क्रेडिट कार्ड, 2.25 अब्ज प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स आणि अनेक नवीन पेमेंट पद्धतींसह देश सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या डिजिटल पेमेंट मार्केटपैकी एक बनणार आहे.

Advertisement

वर्ल्डलाइन इंडियाच्या ‘इंडिया डिजिटल पेमेंट्स रिपोर्ट Q3 2021’ च्या ताज्या अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, कोरोना संकटानंतरही गेल्या दोन वर्षांत देशभरातील ग्रामीण भागात डिजिटल पेमेंटमध्ये वाढ होत आहे. ही वाढ केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नव्हती. अहवालानुसार, टेलिकॉम, हेल्थकेअर, आयटी, रिटेल, ऑटोमोबाईल आणि कृषी यांसारख्या क्षेत्रांमध्ये स्थिर आणि सुरक्षित पेमेंट व्यवस्थेची गरज वाढत आहे.

Advertisement

UPI आणि QR कोड आणल्यामुळे मोबाईल फोनद्वारे ऑनलाइन पद्धतीने व्यवहार केले जात आहेत. एप्रिल 2020 मध्ये मोबाइल अॅप व्यवहार 1.12 अब्ज होते आणि जून 2021 मध्ये 3.7 अब्ज झाले. एप्रिल 2020 मध्ये ते 3.6 ट्रिलियन रुपयांचे व्यवहार झाले होते तर जून 2021 मध्ये ते 11.4 ट्रिलियन रुपयांचे व्यवहार या पद्धतीने झाले.

Loading...
Advertisement

विशेष म्हणजे, गेल्या सहा महिन्यांत 81 टक्के स्मार्टफोन वापरकर्त्यांसह मोबाईलद्वारे दुकानांमध्ये पेमेंटच्या बाबतीत चीन प्रथम क्रमांकावर आहे. डेन्मार्क 41 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोबाइल पेमेंट स्वीकारण्याच्या बाबतीत चीन 39.5 टक्क्यांसह आघाडीवर आहे. त्यानंतर दक्षिण कोरिया 29.9 टक्के आणि व्हिएतनाम 29.1 टक्के आहे. भारत 20.2 टक्क्यांसह सहाव्या तर अमेरिका 17.7 टक्क्यांसह सातव्या क्रमांकावर आहे.

Advertisement

डिजीटल पेमेंटबाबत महत्वाची बातमी; आरबीआयने नेमके काय म्हटलेय, जाणून घ्या..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply