मुंबई : जगात ओमिक्रॉनचा धोका वाढत असताना सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यास प्राधान्य देत आहेत. जगभरात सोन्यास मागणी वाढली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वाढत आहेत. आज मंगळवारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोने दरात वाढ नोंदवण्यात आली. आज सोन्याचे दर प्रति तोळा 47 हजार 780 रुपयांवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचे दर 61 हजार 600 रुपये प्रति किलो वर पोहोचले आहेत.
कमोडिटी मार्केटनुसार आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46 हजार 780 रुपये आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 770 रुपयांवर पोहोचले आहेत. नागपूरमध्ये प्रति तोळा 22 कॅरट सोन्याचे दर 46 हजार 780 रुपये आहेत तर 24 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 780 रुपये इतके आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46 हजार 220 तर 24 कॅरेट सोन्याचे दर तब्बल 49 हजार 550 रुपयांवर पोहोचले आहेत. आज पुण्यात सोन्याचे भाव चांगलेच वाढल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षभरापासून सोन्याचे दर सातत्याने अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर प्रति तोळा 56 हजार असे सर्वाधिक होते. मात्र त्यानंतर भाव सातत्याने कमी होत गेले. या वर्षीतील सप्टेंबर महिन्यात तर सोन्याचे दर 45 हजारांपर्यंत खाली आले होते.
मात्र त्यानंतर पुढील दोन महिन्यांत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये त्यात सरासरी अडीच ते तीन हजारांची वाढ होऊन ते 47 हजारांपर्यंत पोहोचले आहे. सोन्याचे भाव सातत्याने कमी जास्त होत असल्याने गुंतवणूकदार जोखमी घेण्याच्या तयारीत नसल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होत आहे. गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी सोन्यापेक्षा इतर मार्गाचा शोध घेत आहेत, असे दिसत आहे.
तर दुसरीकडे ओमिक्रॉनचा धोका वाढत असल्याने गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळत आहेत, असेही दिसत आहे. जागतिक बाजारात सोन्यास सध्या मागणी वाढत चालली आहे. परिणामी, सोन्याचे दर पुन्हा वाढत चालले आहेत.