Take a fresh look at your lifestyle.

एअर होस्टेससारख्याच आता रेल्वेतही असणार ट्रेन होस्टेस.. जाणून घ्या कोणत्या ट्रेनमध्ये असेल ही सुविधा

मुंबई :  इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी एक नवीन पाऊल उचलले आहे. आता ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एअर होस्टेसच्या धर्तीवर ट्रेन होस्टेसची सुविधा मिळणार आहे.

Advertisement

सध्या ही सुविधा फक्त प्रीमियम ट्रेनमध्येच दिली जाणार आहे. ज्यामध्ये शताब्दी, गतिमान आणि तेजस ट्रेनचा समावेश आहे. या गाड्यांमध्ये महिला कर्मचारी सेवा देतील. आता जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी या ट्रेनमधून प्रवास कराल तेव्हा तुम्हाला सेवा देण्यासाठी ट्रेन होस्टेस मिळतील.

Advertisement

आयआरसीटीसीच्या म्हणण्यानुसार या प्रकारची सेवा सुरू करण्यात आली असून नुकतीच वंदे भारत एक्सप्रेसने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सर्व प्रीमियम ट्रेनमध्ये हा बदल करण्यात आला आहे. यामुळे रेल्वे सुविधांचा दर्जाही सुधारेल. रेल्वेच्या या वापरामुळे प्रवाशांचा प्रवास अनुभवही सुधारेल. चला जाणून घेऊ या आणखी काय खास आहे.

Advertisement

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात 25 प्रीमियम ट्रेन चालवल्या जात आहेत. यामध्ये शताब्दी, राजधानी, दुरांतो, गतिमान, तेजस आणि वंदे भारत या गाड्यांचा समावेश आहे. “ट्रेन होस्टेस” प्रीमियम ट्रेनमध्ये सेवा देणार आहेत. सध्या होस्टेसची सेवा फक्त दिवसा गाड्यांमध्ये उपलब्ध असेल.

Advertisement

सध्या राजधानी आणि दुरांतोमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार नाही. कारण या गाड्या दिवसा आणि रात्री दोन्ही धावतात. याशिवाय इतर सर्व गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल. सध्या भारतीय रेल्वे १२ शताब्दी, एक गतिमान, दोन वंदे भारत, एक तेजस एक्सप्रेस चालवत आहे.

Advertisement

IRCTC च्या मते, रेल्वे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा दिल्या जाऊ शकतात. महिला कर्मचारी पुरुषांपेक्षा चांगली सेवा देऊ शकतात. जसे विमानात दिसते. त्यांची बोलण्याची शैली चांगली आहे. प्रवाशांच्या तक्रारीही कमी होतात. महत्त्वाचे म्हणजे या पाऊलामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल, ज्यामुळे महिलांना काम करण्याची संधी मिळेल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply