नवी दिल्ली : जगभरात चीनी मोबाइल कंपन्यांचा दबदबा आहे. मोबाइल म्हटला की तो चीनी कंपनीचाच, असेच आता दिसत आहे. अन्य कंपन्यांचेही मोबाइल आहेत मात्र, या स्पर्धेत चीनी मोबाइल कंपन्यांनी आघाडी घेतली आहे. भारतातही चायनीज कंपन्यांचेच मोबाइलला जास्त मागणी आहे. सॅमसंगचे मोबाइलचीही क्रेझ आहे. मात्र, यावेळी देशात सॅमसंग कंपनीला झटका बसला आहे. शाओमी आणि सॅमसंगला मागे टाकत रियलमी कंपनीचा स्मार्टफोन नंबर वन ठरला आहे.
शाओमी आणि सॅमसंगला या वर्षी ऑक्टोबरमध्ये मोठा झटका बसला आहे. रियलमी हा भारतातील सर्वात जास्त मार्केट शेअर असलेला स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. Realme हा गेल्या 37 महिन्यांत 100 दशलक्ष स्मार्टफोन निर्यात करणारा स्मार्टफोन ब्रँड आहे.
जर शाओमी आणि पोकोचा व्यवसाय एकत्र केला तर सध्या Realme दुसऱ्या क्रमांकावर राहील. काउंटरपॉइंट रिसर्च रिपोर्टमधून ही बाब समोर आली आहे. शाओमी आणि पोको 20 टक्के, रियलमी 18 टक्के, सॅमसंग 16 टक्के, व्हीवो 13 टक्के, ओप्पो 10 टक्के असे देशात स्मार्टफोनच्या कंपन्या आहेत.
ऑक्टोबर 2012 मध्ये शाओमी चा भारतात 17.3 टक्के बाजार हिस्सा होता. तर पोकोचा बाजारातील हिस्सा 2.7 टक्के इतकाच होता. त्यावेळी रियलमीचा मार्केट शेअर 18 टक्के आहे. सॅमसंगने दुसरा क्रमांक गमावला आहे. 16 टक्के मार्केट शेअरसह सॅमसंग दोनवरुन तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. त्याचवेळी व्हीवो 13 टक्क्यांसह चौथ्या तर 10 टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर राहिला आहे.
काउंटर पॉइंट रिसर्च रिपोर्टनुसार, ऑक्टोबर महिन्यात फ्लिपकार्टवर Realme स्मार्टफोनची जोरदार विक्री झाली आहे. या काळात रियलमीचा बाजारातील हिस्सा 52 टक्के राहिला आहे. ऑनलाइन विक्रीचा विचार केला तर रियलमीचा एकूण बाजार हिस्सा 27 टक्के होता. रियलमी इंटरनॅशनल बिजनेस ग्रुप अध्यक्ष माधव सेठ यांनी सांगितले, की कंपनी 2022 मध्ये देशाचा नंबर वन स्मार्टफोन बनण्याच्या दृष्टीने कार्यवाही करत आहे.
आहात ना तयार..! महागाई देणार आणखी एक झटका; मोबाइल कंपन्या ‘तो’ त्रासदायक निर्णय घेण्याच्या विचारात
भारतात दहा अंकीच मोबाइल नंबर का..? ; कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य; जाणून घ्या, डिटेल