सर्वसामान्यांसाठी खुशखबर..! घरखर्चाचे बजेट होणार हलके; पहा, महिनाभरात नेमके काय घडले..?
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संकटात महागाईनेही सर्वसामान्यांना हैराण केले आहे. इंधनाचे दर तर वाढले आहेतच त्यापाठोपाठ अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड वाढले आहेत. खाद्यतेलांच्या किंमतीही काही दिवसांपासून चांगल्याच वाढल्या आहेत. देशात तेलाचे उत्पादन कमी होते त्यामुळे बरेचसे तेल दुसऱ्या देशांकडून खरेदी करावे लागते. त्यामुळे जागतिक बाजारात घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम तेलाच्या दरावर होतो. तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारनेही प्रयत्न केले. त्याचे आता सकारात्मक परीणाम दिसत आहेत. महागाईच्या काळात सर्वसामान्यांना खुशखबर मिळाली आहे.
मागील काही दिवसांपासून खाद्यतेलांचे दर कमी होत आहेत. केंद्र सरकारने तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरात तेलाचे भाव 8 ते 10 रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच काही दिवसात तेलाच्या किंमती आणखी 3 ते 4 रुपये प्रति लीटरने कमी होण्याची शक्यता आहे.
इंडस्ट्री बॉडी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या तेलबियांचे उत्पादन वाढले आहे. जागतिक बाजारात सध्या मंदी आहे, यामुळे आगामी महिन्यात खाद्यतेलाच्या किंमती 3 ते 4 रुपये प्रति लीटरने कमी होऊ शकतात. असोसिएशनचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी सांगितले, की काही महिन्यांपासून पाम, सोया, सूर्यफूल सारख्या सर्व तेलांच्या आंतरराष्ट्रीय किंमतीमुळे खाद्यतेल ग्राहकांसाठी त्रासदायक ठरत होते.
असोसिएशनने आपल्या सदस्यांना दिवाळीपूर्वी तेलाच्या किंमती शक्य होईल तितक्या कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर दुसरीकडे केंद्राने आयात शुल्कही कमी केले होते. त्यामुळे मागील महिनाभरात तेलाचे दर 8 ते 10 रुपयांनी कमी झाले आहेत.
तरीही खाद्यतेलांचे भाव वाढलेच; सणासुदीच्या काळात नागरिकांना झटका; सरकारी निर्णयही ठरले अपयशी