Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर : नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आणखी एक आनंदाची बातमी

नवी दिल्ली : 2022 ची सुरुवात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूप आनंदाची असणार आहे. त्यांना मिळणारा महागाई भत्ता (DA), महागाई सवलत (DR) वाढण्याची शक्यता असताना घरभाडे भत्ता (HRA) आणि प्रवास भत्ता नुकत्याच झालेल्या वाढीनंतर नवीन वर्षात पुन्हा वाढू शकतो. यासंदर्भात येणारे अहवाल पाहिल्यास कर्मचाऱ्यांना आणखी एक फायदा होणार आहे. वास्तविक, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरवरही सरकार मोठा निर्णय घेऊ शकते.

Advertisement

कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारात फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावते. या कारणामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात अडीच पटीने वाढ होते. 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांचे वेतन भत्त्यांव्यतिरिक्त त्यांचे मूळ वेतन आणि फिटमेंट घटकांवरून ठरवले जाते. म्हणजेच त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास कर्मचाऱ्यांना दुहेरी लाभ मिळणार आहे.

Advertisement

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यात किती वाढ होईल आणि कधी जाहीर होईल, हे सांगणे कठीण आहे. पण महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरून ३४ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, 2022 च्या अर्थसंकल्पात देखील फिटमेंट फॅक्टर देखील ठरवले जाण्याची अपेक्षा आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा अर्थसंकल्पीय खर्चात समावेश केला जाईल.

Loading...
Advertisement

जर आपण किमान मूळ पगाराची गणना पाहिली तर केंद्रीय कर्मचाऱ्याचा किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे. आतापर्यंत ३१ टक्क्यांनुसार त्यांना ५५८० रुपये दरमहा महागाई भत्ता मिळतो. डीए ३४ टक्के झाल्यानंतर हे दरमहा ६१२० रुपये होईल; म्हणजेच दरमहा ५४० रुपयांनी वाढणार आहे. वार्षिक पगारावर नजर टाकली तर त्यात 6,480 रुपयांची वाढ दिसून येते.

Advertisement

कमाल मूळ पगाराबद्दल बोलायचे झाले तर, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ते 56,900 रुपये आहे. सध्या 31 टक्क्यांनुसार त्यांना 17,639 रुपये प्रति महिना डीए दिला जातो. अशा स्थितीत 34 टक्क्यांनुसार डीए मोजला तर तो दरमहा 19,346 रुपये होईल म्हणजेच 1707 रुपयांनी वाढेल. त्यानुसार या कर्मचाऱ्यांच्या पगारात वार्षिक आधारावर 20,484 रुपयांनी वाढ होणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply