Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Cryptocurrency News : ‘क्रिप्टो’वाल्यांनो सावधान..! तर तुमची होऊ शकते थेट जेलवारी..!

पुणे : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत कठोर कायदे करू शकते अशी बातमी आहे. या अंतर्गत, क्रिप्टोकरन्सीमधील व्यवहारांना अजामीनपात्र कलमांखाली अटक वॉरंटशिवाय तुरुंगात पाठवले जाऊ शकते. याशिवाय 20 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाचीही तरतूद असेल. अशी बातमी आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, संसदेत सादर करण्यात येणाऱ्या विधेयकानुसार क्रिप्टोकरन्सीची खरेदी, विक्री, जमा करणे किंवा ठेवण्याचे काम केवळ एक्सचेंजद्वारे केले जाईल. यापैकी कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास वॉरंटशिवाय अटक होऊ शकते, जी अजामीनपात्र असेल.

Advertisement

20 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दीड वर्षांच्या कारावासाचाही नियम सरकार बनवू शकते. याशिवाय क्रिप्टोकरन्सीच्या अंदाधुंद जाहिरातींवरही बंदी घालण्याच्या तयारीत आहे. कारण खोटी माहिती देऊन गुंतवणूकदारांना फसवल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे विधेयक क्रिप्टोकरन्सी असलेल्या वॉलेट्सवर देखील निर्बंध लादू शकते आणि ते केवळ एक्सचेंजद्वारेच करण्याची परवानगी असेल. एका अंदाजानुसार, सुमारे 20 दशलक्ष भारतीयांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये 45 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. क्रिप्टोकरन्सीसंदर्भातील कायद्यानुसार, सरकार गुंतवणूकदारांना मालमत्ता घोषित करण्यासाठी आणि नवीन नियमांचे पालन करण्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकते. त्यावर पूर्णपणे बंदी घालण्याऐवजी नियमन करण्याचा सरकारचा हेतू असल्याचे यावरून स्पष्ट होते. या विधेयकात क्रिप्टोकरन्सीऐवजी क्रिप्टोअसेट हा शब्द वापरण्यात येणार आहे. यासोबतच छोट्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी किमान गुंतवणुकीची मर्यादाही निश्चित केली जाईल.

Loading...
Advertisement

सूत्रांचे म्हणणे आहे की बाजार नियामक सेबीकडे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवले जाईल. एकदा ती मालमत्ता म्हणून वर्गीकृत झाल्यानंतर, फक्त गुंतवणुकीला परवानगी दिली जाईल आणि सेबी भांडवली बाजाराप्रमाणे त्याचे नियमन करेल. देशातील क्रिप्टोकरन्सी बेस वाढतच चालला आहे आणि सरकार गुंतवणूकदारांना त्याच्या जोखमीपासून संरक्षण करण्यासाठी सज्ज आहे. ऑक्‍टोबरमध्‍ये प्रसिद्ध झालेल्या चैनॅलिसिसच्‍या अहवालानुसार, जून 2021 पर्यंत भारतातील क्रिप्टो मार्केट 641 टक्के वाढले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply