आठवड्यात साडेचार दिवसच करा काम.. अडीच दिवस हक्काची सुट्टी : कोणत्या देशात आहे हा नियम
मुंबई : संयुक्त अरब अमिराती (UAE) ने आठवड्यातील त्यांच्या अधिकृत कामाच्या तासांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता येथील कर्मचाऱ्यांना पाच ऐवजी साडेचार दिवस काम करावे लागणार आहे. वीकेंडची सुट्टी शुक्रवारी दुपारी सुरू होईल आणि शनिवार आणि रविवारपर्यंत चालेल. सरकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
1 जानेवारी 2022 पासून, देशातील सरकारी संस्थांना राष्ट्रीय कार्य सप्ताह प्रणालीचे पालन करणे अनिवार्य होईल. UAE ने याचे वर्णन जगातील सर्वात लहान कामकाजाचा आठवडा प्रणाली म्हणून केले आहे.आता UAE मध्ये वीकेंड शुक्रवार दुपारपासून शनिवार आणि रविवारपर्यंत सुरू होईल. नवीन नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. कामकाजाचा आठवडा साडेचार दिवसांवर आणला जाईल.
आता वीकेंड शुक्रवार, शनिवार आणि रविवार असेल. शुक्रवार दुपारपासून वीकेंडची सुटी सुरू होणार आहे. कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून साडेचार दिवस काम करावे लागेल आणि अडीच दिवस सुट्टी मिळेल.अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की यूएई सरकारचे हे पाऊल येथे सकारात्मक स्पर्धेला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
अधिकृत वृत्तसंस्था डब्ल्यूएएमने म्हटले आहे की, जागतिक प्रणालीच्या तुलनेत (आठवड्यातील पाच कामकाजाचे दिवस) सर्वात कमी कामकाजाचा आठवडा असणारा UAE हा जगातील पहिला देश बनला आहे. या हालचालीमुळे येथील कर्मचाऱ्यांना काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यात चांगला समतोल साधण्याची संधी मिळेल.या निर्णयामुळे यूएईला जागतिक बाजारपेठेशी जोडले जाईल.
आर्थिक दृष्टिकोनातून, ही नवीन व्यवस्था युएईला जागतिक बाजारपेठेशी अधिक चांगल्या प्रकारे जोडेल, असे WM अहवालात म्हटले आहे. यासोबतच देशाची आर्थिक स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी आमची कामगिरी वाढवण्यातही मदत होईल. या निर्णयामुळे इतर जगासह देशाच्या आर्थिक घडामोडींमध्येही सुधारणा होणार आहे असेही अहवालात म्हटले आहे.