नवी दिल्ली : देशात इंधनाच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक राज्यात या किंमती वेगळ्या आहेत. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर काही राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी केला होता. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. प्रत्येक राज्यात इंधनाचे दर समान नाहीत. आता या मुद्द्यावर केंद्र सरकारने महत्वाची माहिती दिली आहे. केंद्र सरकारने नेमके काय म्हटले आहे, हे जाणून घेणे तुमच्यासाठीही महत्वाचे आहे.
केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे, की देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर एक समान ठेवण्यासाठी सरकारकडे कोणतीही योजना विचाराधीन नाही. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना पेट्रोलियम राज्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. अनेक कारणांमुळे इंधनाचे दर प्रत्येक ठिकाणी एक समान नसतात, असेही त्यांनी सांगितले.
पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू या इंधनाना जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी जीएसटी परिषदेने तशी शिफारस करणे गरजेचे आहे. मात्र, जीएसटी परिषदेने अद्याप शिफारस केलेली नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, आज सलग दुसऱ्या दिवशी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तरी सुद्धा देशात पेट्रोलियम कंपन्यांनी अद्याप इंधन दरवाढ केलेली नाही. याआधी काल सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या होत्या. सध्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे संकट उभे राहिले आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांनी कठोर निर्बंध टाकले आहेत. त्यामुळे पेट्रोलियम पदार्थांना मागणी काही प्रमाणात कमी झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून मागील दोन दिवसांपासून जागतिक बाजारात क्रूड तेलाच्या किंमती वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
अरे वा आश्चर्यच आहे..! तरीही पेट्रोलियम कंपन्यांनी ‘तो’ निर्णय घेणे टाळले; नागरिकांना मिळाला दिलासा