Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पेप्सिको इंडियाला धक्का : बटाट्याबाबतच्या एका याचिकेवर न्यायालयाने दिला हा निर्णय

मुंबई : अथॉरिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राइट्स (PPV&FR) ने शुक्रवारी पेप्सिको इंडियाला मोठा धक्का दिला. प्राधिकरणाने पेप्सिको इंडियाला ‘FL-2027’ या बटाट्याच्या जातीसाठी दिलेले नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे.

Advertisement

याबाबत कंपनीने म्हटले आहे की, आम्ही सध्या प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाचा अभ्यास करत आहोत. हा प्राधिकरण वनस्पती जातींच्या संरक्षणासाठी आणि शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी कायद्यांतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे.

Advertisement

कृषी कार्यकर्त्या कविता कुरुगंटी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय घेण्यात आला आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे हा अधिकार आणि प्रमाणपत्र पेप्सिको इंडियाला देण्यात आल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

Loading...
Advertisement

याचिकेनुसार, पेप्सिको इंडियाला बटाट्याच्या जातीवर दिलेली बौद्धिक संपदा हक्क (IPR) नोंदणी विहित नियमांनुसार नव्हती. ते जनहिताच्या विरोधात असल्याचे याचिकेत म्हटले आहे. प्राधिकरणाने याचिकाकर्त्याशी सहमती दर्शवत निबंधकांचे प्रमाणपत्र जारी केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि तत्काळ प्रभावाने नोंदणी रद्द केली.

Advertisement

या निर्णयात प्राधिकरणानेही निबंधकांवर नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांच्या हक्काचे रक्षक असूनही त्यांनी नियमांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांना व इतरांना त्रास दिल्याचे म्हटले आहे. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. प्राधिकरणाने निबंधकांना नियमानुसार वनस्पती जातींच्या नोंदणीसाठी अर्जाचे मूल्यमापन करण्यासाठी प्रमाणित पत्रक तयार करण्याचे निर्देश दिले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply