Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ चुका केल्यास होणार ‘PM किसान’ची वसुली; पहा कधी येणार आहे दहावा हफ्ता

पुणे : देशातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि शेतीला आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत. त्यापैकी मुख्य म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना होय. या योजनेमुळे ज्या गरीब शेतकऱ्यांना खते, बियाणे खरेदीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यांना किमान काही दिलासा मिळाला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केलेल्या 12 कोटी शेतकऱ्यांना सरकार लवकरच योजनेचा 10 वा हप्ता डिसेंबरमध्ये देणार आहे. योजनेअंतर्गत 2000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातील. अशावेळी काही गोष्टी आपण केल्या तर आपणास ही रक्कम मिळणार नाहीच, उलट त्याची वसुली होईल.

Advertisement

या योजनेत असे काही शेतकरी आहेत जे उत्पन्न चांगले असतानाही या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा शेतकर्‍यांवर सरकारनेही कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सरकार आता आधार आणि पॅन कार्ड लिंकिंगद्वारे अपात्र शेतकर्‍यांचा शोध घेईल आणि त्यांच्याकडून पैसेही वसूल करणार आहे. अशा परिस्थितीत या योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी पात्र आहेत की नाही हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण पकडले गेल्यास पैसेही परत करावे लागू शकतात. कारण, जे शेतकरी आपल्या जमिनीची मशागत न करता इतर कामे करतात ते या योजनेसाठी अपात्र आहेत. तसेच जे शेतकरी आपली शेतजमीन हिश्शावर देतात, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Advertisement

ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्य सरकारला आयकर अर्थात इन्कमटॅक्स भरतात तो देखील या योजनेसाठी अपात्र असतो. यासह असा शेतकरी जो कोणत्याही शासकीय सेवेत आहे किंवा सेवानिवृत्त झाला आहे, त्यालाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. माजी खासदार, आमदार, मंत्रीही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. ही योजना शेतकऱ्यांसाठी सरकारच्या महत्त्वाकांक्षी आर्थिक योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत शेतकर्‍याच्या खात्यात वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये एकूण 6000 रुपये थेट दिले जातात. म्हणजेच प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ 2 हेक्टर जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिला जातो.

Advertisement

Advertisement

Leave a Reply