Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. दणकाच की.. तब्बल 46 हजार कोटींची ‘कर्जमाफी’..! पहा केंद्र सरकराने नेमके काय केलेय

पुणे : शेतकरी कर्जमाफी म्हणजे देशावरील संकट असल्याच्या फुकाच्या बाता अनेक अर्थतज्ञ मारतात. सामान्य शेतकरी असो की मग नवे तरुण व्यावसायिक असोत. त्यांना कर्ज देण्यात आणि मिळण्यात शेकडो अडचणी असतात. मात्र, त्याचवेळी बडे व्यावसायिक आणि राजकीय नेत्यांच्या संबंधित व्यावसायिक, व्यक्ती आणि संस्थांना हजारो कोटी कर्ज वाटले जाते आणि राईट ऑफ या गोंडस नावाखाली त्याचा कर्जमाफी दिली जाते. तसाच प्रकार वेळोवेळी चालू असतो. आताही चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तब्बल 46 हजार कोटींचे कर्ज राईट पद्धतीने ऑफ करण्यात आलेले आहे.

Advertisement

याबाबत मुक्त पत्रकार आणि शेतकरी विषयाचे अभ्यासक ब्रम्हा चट्टे यांनी ट्विटरवर सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यात त्यांनी म्हटलेय की, “वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सरकारने केले उद्योजकांचे 46382 कोटी रुपये माफ. भटजी शेटजीच्या सरकारकडे मात्र शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला पैसे नाहीत. उद्योजकांना द्यायला मात्र आहेत.” अशा पद्धतीने संसदेत माहिती देण्यासाठी असलेल्या कॉपीमध्ये नेमके काय म्हटलेय हा मुद्दा चट्टे यांनी लावून धरला आहे. त्याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष गेले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply