Take a fresh look at your lifestyle.

होय, LPG गॅस सिलिंडरवर असतोय 50 लाखांचा विमा..! वाचा खूप महत्वाची अशी माहिती

पुणे : शहर असो वा गाव असो LPG गॅस सिलिंडर ही गरज बनली आहे. देशातील कोट्यवधी घरांच्या स्वयंपाकघरात LPG गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. हे आपल्यासाठी जेवढे सोयीस्कर आहे तेवढेच महत्वाचे आहे. पण कधीकधी आपली छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणा यामुळे एलपीजी गॅस सिलिंडर आपल्यासाठी किंवा कुटुंबियांसाठी तितकाच घातक ठरू शकतो. तुम्हाला माहीत आहे का की तुमचे हे नुकसान भरून काढण्यासाठी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम सारख्या पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलिंडरवर विमा संरक्षण देतात. हे विमा संरक्षण 50 लाख रुपयांपर्यंत आहे. गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे किंवा स्फोटामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी तुम्ही या LPG गॅस सिलेंडर विम्याचा (गॅस सिलेंडर इन्शुरन्स बेनिफिट्स) लाभ घेऊ शकता. (LPG Gas Cylinder insurance Benefits)

Advertisement

यासाठीचा दावा करताना काळजी घ्यावी लागेल. घरातील गॅस सिलिंडर गळती, स्फोट किंवा इतर संबंधित कारणामुळे घरातील जीवित आणि मालमत्तेची हानी झाल्यास असा क्लेम करता येतो. त्यामुळे क्लेम घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला http://mylpg.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. या वेबसाइटनुसार एलपीजी गॅस कनेक्शन घेतल्यावर ग्राहकाला कोणतीही दुर्घटना घडल्यास 50 लाख रुपयांचा विमा मिळतो. हा विमा कोणत्याही ग्राहकाच्या नावावर नाही. उलट प्रत्येक ग्राहक या कव्हरमध्ये असतो. LPG सिलेंडरवर 50 लाख रुपयांची भरपाई मिळते. यामध्ये अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला कमाल 10 लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाऊ शकते. अशावेळी एलपीजी सिलिंडरचा अपघात विमा घेण्यासाठी कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार करा. यासोबतच एलपीजी वितरकालाही याची माहिती देणे आवश्यक आहे.

Advertisement

एलपीजी अपघातात दावा करण्यासाठी पोलीस एफआयआरची प्रत, मालाच्या नुकसानीची यादी आणि बिल, जखमी व्यक्तींवर रुग्णालयात उपचारादरम्यान खर्च झालेल्या रुपयांचे बिल, मृत्यू झालेल्या व्यक्तीचा पोस्टमार्टम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. गॅस सिलिंडरचा अपघात झाल्यास आपल्या परिसरातील पोलीस ठाण्यात त्वरित तक्रार नोंदवणे बंधनकारक आहे. यासोबतच तुमच्या सिलेंडर वितरकालाही या प्रकरणाची माहिती देणे आवश्यक आहे. यानंतर संबंधित क्षेत्र अधिकारी या प्रकरणाची चौकशी करतात. यामध्ये अपघाताचे कारण, नुकसान व इतर अनुषंगिक बाबी तपासल्या जातात. एलपीजी सिलेंडरमुळे हा अपघात झाला असा वितरक एजन्सी किंवा क्षेत्र अधिकारी त्याचा अहवाल विमा कंपनीला पाठवतात. यानंतर संबंधित विमा कंपनीकडे दावा दाखल केला जातो.

Advertisement
Advertisement

Leave a Reply