Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. घ्या आणखीही एक मास्टरस्ट्रोक..! मोदी सरकारच्या कृपेने असाही बसणार खिशाला झटका..!

पुणे : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपला फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन काही आर्थिक बदल झालेले आहेत. जसे की शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासह पेट्रोलचे भाव कमी झाले. मात्र, आता त्याची नुकसानभरपाई करण्याची नवी स्कीम लागू होत आहे. त्यानुसार आता कपडे, चप्पल आणि बूट यांचे भाव वाढणार आहेत.

Advertisement

टेक्सटाइल, कपडे आणि पादत्राणे आता यामुळे महाग होणार आहेत. सरकारने या गोष्टींवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून थेट 12 टक्के केला आहे. हे दर जानेवारी 2022 पासून लागू होतील. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBIT) ने 18 नोव्हेंबर रोजी एक अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. फॅब्रिकवरील जीएसटी जानेवारी 2022 पासून 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. आता कोणत्याही किंमतीच्या फॅब्रिकवर 12 टक्के जीएसटी आकारला जाईल. यापूर्वी 1000 रुपयांपर्यंतच्या कपड्यांवर 5 टक्के जीएसटी लागू होता. आता विणलेले कापड, सिंथेटिक धागे, थाना, ब्लँकेट, तंबू, टेबल क्लॉथ, रग यासह अनेक प्रकारच्या कापडांवर जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. फुटवेअरवरही 12 टक्के जीएसटी लागणार आहे.

Loading...
Advertisement

अनेक सामान्य वापराच्या वस्तूंनाही जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. 150 वस्तू आणि 80 पेक्षा जास्त सेवांवर जीएसटी आकारला जात नाही. गेल्या काही महिन्यांत जीएसटी संकलनात उत्साहवर्धक कल असल्याचे कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्लॅबमध्ये काही सुधारणा करता येतील. सरकार 5 टक्के टॅक्स स्लॅब हटवू शकते. परिणामी आता 12, 18 आणि 28 टक्केच दर ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 5 आणि 12 टक्‍क्‍यांचा स्लॅब एकत्र केल्‍याने आता केवळ 12 टक्‍क्‍यांचा स्‍लॅब कायम राहणार आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या गटाची (GoM) लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये GST कौन्सिलच्या शिफारशींचा विचार केला जाईल आणि त्यांना अंतिम रूप दिले जाईल. मागील जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महसुलाच्या विविध पैलूंवर सादरीकरण करण्यात आले होते. मात्र, यामध्ये राज्यांची भरपाई संपवण्याचा विचार करण्यात आला नाही. जुलै 2022 मध्ये राज्यांना भरपाई देण्याचा नियम संपुष्टात येईल. यानंतर, राज्यांनी यावर कसे पुढे जायचे हे ठरवायचे आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply