Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी आंदोलकाचा झाला विजय..! अखेर कृषी कायदे केंद्राने घेतले मागे..!

दिल्ली : तीन कृषी सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने देशातील कृषी बाजारपेठ मोजक्या उद्योजकांच्या हातात देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप करून दिल्लीच्या नजीक शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. वर्षभरात सरकार व आंदोलक यांच्यात अनेकदा चर्चा होऊनही यावर तोडगा निघाला नव्हता. उलट भाजप नेते व कार्यकर्त्यांनी आंदोलकांवर दहशतवादी असल्याची टीका केली होती. मात्र, आता अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्याचे अनेकांनी स्वागत केले आहे.

Advertisement

मोदींनी देशाला संबोधित करताना म्हटले आहे की, आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू. आमचे सरकार शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे, निष्ठेने शेतकऱ्यांसाठी चांगल्या हेतूने हा कायदा आणला होता. पण एवढी पवित्र, निव्वळ शुद्ध, शेतकऱ्यांच्या हिताची बाब, आम्ही प्रयत्न करूनही काही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही. कृषी अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी यांनीही त्यांना कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply